fbpx
Monday, June 17, 2024
NATIONALTOP NEWS

कोरोना – देशात २४ तासांत ३ लाख ५२ हजार ९९१ नवीन रुग्ण

नवी दिल्ली – देशात कोरोना परिस्थिती़ अधिक गंभीर होत असल्याचे दिसत आहे. मागील २४ तासात भारतात आत्तापर्यंत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. देशात आज ३ लाख ५२ हजार ९९१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर कोरोनामुळे मृत झालेल्या मृतांचा आकडा २८१२ वर पोहचला आहे. त्यामुळे देशात कोरोनाचा कहर कायम असून आज कोरोनामुळे मृत्य पावणाऱ्या रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला आहे. तर गेल्या २४ तासांत देशातील २ लाख १९ हजार २७२ कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांनी घरी सोडण्यात आले आहे.

भारतात गेल्या २४ तासांत तब्बल २ हजार ८१२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा सर्वाधिक आकडा आज एकट्या भारतात वाढत आहे. देशातील एकूण रुग्णसंख्याही १ कोटी ७३ लाख १३ हजार १६३ वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत १ लाख ९५ हजार १२३ रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. तर देशात आत्तापर्यंत १ कोटी ४३ लाख ४ हजार ३८२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सध्या देशात २८ लाख १३ हजार ६५८ अॅटिव्ह रुग्ण आहेत. या रुग्णांवर रुग्णालयात किंवा डॉक्टरांच्या निर्देशानुसार आपल्या घरीच आयसोलेशनमध्ये ठेवून उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading