Saturday, May 30, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्याला मोठा दिलासा; सोमवारी ७१ हजार रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई – राज्यात कोरोनाची परिस्थिती विदारक बनत असताना आज अत्यंत सकारात्मक बातमी समोर आली आहे. गेल्या २४ तासांत ४८ हजार ७०० नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर, तब्बल ७१ हजार ७३६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्याकाही दिवसांपासून राज्यातून सतत नकारात्मक बातम्या येत असताना ही सकारात्मक बातमी समोर आल्याने येत्या दिवसांत परिस्थिती आणखी सुधारेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

आतापर्यंत एकूण 36 लाख 01 हजार 796 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.92 टक्के झाले आहे. राज्यात एकूण 36 लाख 98 हजार 354 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज एकूण 524 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.05 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 65 हजार 284 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या 524 मृत्यूंपैकी 293 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 116 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 115मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत.

मुंबईत गेल्या 24 तासात 3840 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. . आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 5 लाख 44 हजार 958 वर पोहोचली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर 86 टक्के आहे. सध्या 70 हजार 373 एकूण सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुप्पटीचा दर 62 दिवस आहे.

पुणे शहर अपडेट

  • दिवसभरात २५३८ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात ४३५१ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत ७० रुग्णांचा मृत्यू. १६ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • १३७१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४०२६५५.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४७४२०.
  • एकूण मृत्यू -६५५४.
    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३४८६८१.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १६११२.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading