महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय; सर्वांचे होणार मोफत लसीकरण
मुंबई, दि. २५ – राज्यात कोरोनाने सर्वसामान्य लोकांची चिंता वाढवली असतानाच आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्य सरकार कडून राज्यातील सर्व नागरिकांना मोफत लसीकरण करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
राज्यात १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असून स्वस्त दरात व चांगली लस उपलब्ध व्हावी यासाठी जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे. राज्यसरकारच्या तिजोरीतून हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती राष्ट्रीय प्रवक्ते ना. @nawabmalikncp यांनी दिली.
— NCP (@NCPspeaks) April 25, 2021
वाचा- https://t.co/j88KNA0ldf
महाराष्ट्र सरकार सर्व नागरिकांना विनाशुल्क लसीकरण करेल असं ट्विट मंत्री नवाब मलिक यांनी केले.सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेईल. जागतिक टेंडर मागवण्यात येणार असून जास्तीत जास्त लस खरेदी करण्यात येणार आहे असे नवाब मलिक यांनी म्हंटल.
मागच्या कॅबिनेटमध्ये राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच (शनिवारी) जाहीर केले आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले. दरम्यान मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले
यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोफत लसीकरणा बाबत संकेत दिले होते.
