Saturday, May 30, 2026
MAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

मासिक पाळीदरम्यान कोरोनाची लस घ्यायची की नाही? वाचा काय आहे सत्य

पुणे, दि. 25 – केंद्र सरकार 1 मे पासून 18 वर्षाच्या वरील नागरिकांसाठी कोरोनाचे लसीकरण सुरू केले आहे. या लसीकरणाची घोषणा झाली व त्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली की महिलांनी मासिक पाळीदरम्यान तसेच पाळीच्या आधी व नंतर पाच दिवस लस घेऊ नये असे या पोस्टमधून सांगण्यात येत आहे. मात्र ही पोस्ट कितपत खरी आहे याबाबत काहीच समोर आले नव्हते.

अखेर केंद्र सरकारने ही पोस्ट खोटी असल्याचे जाहीर केले आहे. पीआयबीने त्यांच्या ट्विटर हँडलवरून सोशल मीडियावर फिरणारी ती पोस्ट खोटी असून अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असे त्यांनी सांगितले आहे. तसेच 1 मे नंतर 18 वर्षांवरील सर्वांनी लस घ्या असे सांगितले आहे. अनेक डॉक्टरांनी देखील मासिक पाळीच्या वेळी तुम्ही कोरोनाची लस घेऊ शकता असे सांगितले आहे.

आपल्याकडे मासिक पाळीसंदर्भात ज्या अंधश्रध्दा आहे, त्यातूनच या पोस्ट व्हायरल होत आहेत की मासिक पाळीत लस घेऊ नये. मात्र लस घेणं, मासिक पाळी, प्रतिकार शक्ती यांच्या परस्पर संबंधांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही. महिलांनी लस घ्यावी, मासिक पाळीच्या काळातही घ्यायला काहीच हरकत नाही.

– डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading