Saturday, June 13, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्यात रविवारी ६१ हजार रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांची आकडा दिवसेंदिवस वाढत जाताना दिसतोय. पुणे, मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा कमी होत असला तरीही संपूर्ण राज्यातील आकडेवारी वाढत जाणारी आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६६ हजार १९१ नव्या बाधितांची नोंद झाली आहे. मात्र, दिलासा म्हणून तेवढ्याच प्रमाणात बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. गेल्या २४ तासांत ६१ हजार ४५० रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे.

गेल्या २४ तासांत राज्यात ६६ हजार १९१ नवे रुग्ण सापडले तर ६१ हजार ४५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर एकूण ८३२ बाधितांचा मृतांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात सध्या ६ लाख ९८ हजार ३५४ रुग्णांवर उपचार सुरू असून ३५ लाख ३० हजार ६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर राज्यात आतापर्यंत ६४ हजार ७६० रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.

पुणे शहर कोरोना अपडेट्स

  • दिवसभरात ४६३१ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात ४७५९ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत ७६ रुग्णांचा मृत्यू. २१ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • १३६९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४००११७.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४९२८९.
  • एकूण मृत्यू -६४९८.
    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३४४३३०.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २०३४८.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading