कोरोना – आज राज्यात ६७ हजार १३ नवीन रुग्ण; ५६८ जणांचा मृत्यू
मुंबई, दि. २२ – गेल्या २४ तासांत राज्यात ६७ हजार १३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५६८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४० लाख ९४ हजार ८४०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६२ हजार ४७९ जणांचा मृत्यू झाला आहे.
आज नोंद झालेल्या एकूण ५६८ मृत्यूंपैकी ३०९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १०१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १०१ मृत्यू, यवतमाळ- २२, रायगड- १६, नागपूर- १३, नांदेड- ९, नाशिक- ८, औरंगाबाद- ७, परभणी- ५, सोलापूर- ४, ठाणे- ४, वर्धा- ४, अहमदनगर- ३, कोल्हापूर- २, जळगाव- १, नंदूरबार- १, पुणे- १ आणि सातारा- १ असे आहेत. तसेच आज दिवसभरात ६२ हजार २९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ३३ लाख ३० हजार ७४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.३४ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५३ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ४८ लाख ९५ हजार ९८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४० लाख ९४ हजार ८४० (१६.४५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९ लाख ७१ हजार ९१७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९ हजार १४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात ६ लाख ९९ हजार ८५८ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
पुणे कोरोना अपडेट
- दिवसभरात ४५३९ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात ४८५१ रुग्णांना डिस्चार्ज.
- करोनाबाधीत ८० रुग्णांचा मृत्यू. २४ रूग्ण पुण्याबाहेरील.
- १३१३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३८७०३०.
- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५१५५२
- एकूण मृत्यू -६३३०.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज3 ३२९१४८.
- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २२२७७.
