Saturday, May 30, 2026
Business

अक्सिस डायरेक्टतर्फे ‘अक्सिस डायरेक्ट रिंग’ हे रिव्होल्यूशनरी मोबाइल अप्लिकेशन लाँच

मुंबई, दि. 22 – अक्सिस डायरेक्ट या अक्सिस सिक्युरीटीजचा प्रमुख ब्रँड आणि अक्सिस बँकेच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या अक्सिस बँकेच्या उपकंपनीने ‘अक्सिस डायरेक्ट रिंग’ हे क्रांतीकारी मोबाइल अप लाँच केल्याचे जाहीर केले आहे. या अपच्या मदतीने शेयर बाजारपेठेतील गुंतवणूक सोपी, जलद आणि फलदायी होणार आहे. अक्सिस डायरेक्ट रिंग बारकाईने बाजारपेठेचे स्कॅन करून गुंतवणुकदारांना दर 60 सेकंदाला गुंतवणुकीची संधी शोधून देणार आहे. हे अत्याधुनिक अप गुंतवणूकदार तसेच ट्रेडर्सना विचारपूर्वक निर्णय घेण्यास मदत करणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आलेले अक्सिस डायरेक्ट रिंग जलद व स्मार्ट पद्धतीने ट्रेडिंग करण्यासाठी आवश्यक नियंत्रण, वेग आणि लवचिकता मिळवून देईल.

अक्सिस डायरेक्ट रिंगला स्क्रीनर्स या बुद्धीमान टुलची जोड देण्यात आली असून ते रियल टाइममधे 25,000 कॉन्ट्रॅक्ट्स आणि 5000 सिक्युरीटीज स्कॅन करते. त्यासाठी संख्या, किंमत, मुक्त व्याज, तांत्रिक आणि मूलभूत विश्लेषण अशा विविध निकषांचा वापर करून गुंतवणुकीच्या संधी शोधल्या जातात. या अपच्या माध्यमातून ग्राहकांना वेगवेगळ्या एक्सचेंजेसमधील इक्विटी, एफ अँड ओ, करन्सी, कमॉडिटी, म्युच्युअल फंड्स अशा साधनांमधे एकाच व्यासपीठावरून सहजपणे गुंतवणूक करता येईल. हे ट्रेडिंग अप नॅव्हिगेशन आणि कमीत कमी क्लिक्सच्या मदतीने ऑर्डर करण्यास मदत करते व पर्यायाने वापरकर्त्यास जास्त चांगला अनुभव देते.

लाँचप्रसंगी अक्सिस सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बी गोपकुमार म्हणाले, ‘विश्वासार्ह ब्रोकरेज संस्था या नात्याने आम्ही ग्राहकांना नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजनांच्या मदतीने शेयर बाजारपेठेचा लाभ घेण्यासाठी सक्षम करण्याचे ध्येय ठेवले आहे. अक्सिस डायरेक्ट रिंगचे लाँच हा ग्राहकांचा अनुभव उंचावण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. हे दमदार अप वेगवान ट्रेडिंग इंटरफेज आणि शेयर्सच्या किंमतीचा रियल- टाइम अक्सेस देत ट्रेड्सची तत्काळ अमलबजावणी करते. अनोखी वैशिष्ट्ये आणि सोप्या युजर इंटरफेजच्या मदतीने अक्सिस डायरेक्ट रिंग आमचे गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सना अस्थिर बाजारपेठेतही चांगली कामगिरी मिळवण्यास मदत करेल.’

अक्सिस डायरेक्ट रिंग सर्व भारतीय शेयर बाजारपेठा आणि एक्सचेंजेसचा (बीएसई, एनएसई आणि एमसीएक्स) तपशीलवार आढावा पुरवते तसेच स्क्रीनर्स, अंतर्ज्ञानी चार्ट्स, तपशीलवार कोट्स, किंमतीच्या सूचना, रिसर्च कॉल्स, अपडेट्स अशा प्रकारच्या ट्रेडिंग टुल्सची मोठी श्रेणी उपलब्ध करून देते. हे अप नवशिके तसेच व्यावसायिक गुंतवणुकदारांच्या गुंतवणुकविषयक गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. बाजारपेठेची स्थिती, किंमती, शेयरचे तपशीलवार विश्लेषण रियल टाइममधे उपलब्ध करून देत हे अप अक्सिस डायरेक्टचे ग्राहक बाजारपेठेतील कोणतीही संधी चुकवणार नाहीत याची काळजी घेते. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading