Saturday, September 5, 2026
Business

‘गोदरेज लॉक्स’ला – ‘स्मार्ट किचन स्टोरेज सोल्यूशन ब्रँड’ ‘स्किडो’ बाजारात सादर

मुंबई – गोदरेज समुहातील प्रमुख कंपनी, ‘गोदरेज अँड बॉइस’ हिचा व्यवसाय असलेल्या ‘गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्स’ या व्यावसायिक युनिटला ‘गोदरेज किचन फिटिंग्ज आणि सिस्टीम्स’च्या व्यवसायात पुढील 5 वर्षांमध्ये 100 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. कंपनीने ‘स्मार्ट किचन स्टोरेज सोल्यूशन्स’ची एक अभिनव श्रेणी, “स्किडो” (स्मार्ट किचन ड्रॉवर्स अँड ऑर्गनायझर्स) सादर केली आहे. भारतीय स्वयंपाकघरांमधील अनोख्या स्वरुपाच्या गरजा भागविण्याच्या दृष्टीने कंपनीने स्किडोची खास रचना केली आहे. खास ‘भारतात डिझाइन केलेले आणि भारतासाठी बनविलेले’ हे उत्पादन आहे. स्वयंपाकघरातील कटलरी, कप व बशी, कढई, फ्राय पॅन, ताटे, पातेली आणि जार व बाटल्या यांसाठी किचन ड्रॉवर्स आणि समर्पित ऑर्गनायझर्स अशा आठ उत्पादनांचा या ‘स्किडो’ श्रेणीमध्ये समावेश आहे.

भारतीय स्वयंपाकघर आणि स्वयंपाकाच्या विविध शैलींचा अभ्यास करण्यासाठी कंपनीने व्यापक संशोधन केले. त्यातून ‘स्किडो’ ही श्रेणी विकसीत करण्यात आली. या संशोधनातून निघालेल्या निष्कर्षांनुसार, स्वयंपाकघर वापरणाऱ्या व्यक्तींचे वावरणे सोपे व सुटसुटीत व्हावे, अशा पद्धतीने ‘गोदरेज लॉक्स’ने नाविन्यपूर्ण स्टोरेज सोल्यूशन्सची स्किडो ही श्रेणी तयार केली. सध्या बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या किचन स्टोरेज उत्पादनांवर पाश्चिमात्य स्वरुपाच्या किचनचा प्रभाव आहे आणि ग्राहकांनादेखील त्याशिवाय इतर पर्याय उपलब्ध नाहीत, हे लक्षात घेऊन खास भारतीय स्वयंपाकघराला व तेथील जागेला अनुकूल ठरतील, असे उपाय योजण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. त्या दृष्टीने ‘स्किडो स्टोरेज सोल्यूशन’ हे स्वयंपाकघरात बसवणे सोयीस्कर आहे, त्याची हलवाहलव करणे सोपे आहे आणि ते अनेक प्रकारे वापरू शकण्याजोगे आहे.

‘स्किडो’च्या सादरीकरणासंदर्भात ‘गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्स’चे कार्यकारी उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख शाम मोटवानी म्हणाले, “भारतीय मॉड्यूलर किचन व्यवसायाचे बाजारमूल्य 2500 कोटी रुपये इतके आहे. 2019-2024 या 5 वर्षांत या मूल्यामध्ये दरवर्षी सुमारे 27 टक्क्यांची वाढ होत जाणार आहे. या विभागामध्ये प्रचंड क्षमता आहे, असे आमचे निरीक्षण असून गेल्या वर्षी आमच्या विक्रीमध्ये या विभागाचा वाटा 4 टक्के इतका होता. पुढील काही वर्षांत, या विभागातून 100 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे आमचे लक्ष्य आहे. आधुनिक भारतीय कुटुंबे आता स्वयंपाकघराचा वापर एरवीपेक्षा जास्त करू लागली आहेत व स्वयंपाकघरांमध्ये प्रभावी सोल्युशन्स असावीत, अशी आकांक्षा बाळगू लागली आहेत. त्यामुळे ‘किचन अॅक्सेसरीज’ना आता नव्याने मागणी येऊ लागली असल्याचे आम्हाला दिसून येत आहे. ही मागणी व्यवसायवाढीला निश्चितच पूरक ठरणार आहे.” 

‘किचन सिस्टीम्स’ या विभागात ‘गोदरेज लॉक्स’ ही कंपनी 2015 पासूनच कार्यरत आहे. या विभागात कंपनीने आतापर्यंत एर्गो ड्रॉवर्स, वायर बास्केट्स, कॉर्नर सोल्युशन्स, टॉल युनिट्स, सॉफ्ट प्रो सिस्टीम्स, ड्रॉवर चॅनेल्स आणि हिंजेस अशी विविध उत्पादने आणली. या विभागात आता ‘स्किडो’ हे नवीन उत्पादन दाखल झाले आहे. ‘स्किडो’ची किंमत प्रति सेट 15000 ते 20000 रुपयांपासून सुरू होते आणि सामान्य दुकानांत व हार्डवेअर दुकानांमध्ये हे उत्पादन उपलब्ध असेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading