निवडणूक विश्लेषक प्रदीप गुप्ता यांचे ‘हाउ इंडिया व्होट्स : अँड व्हॉट इट मीन्स’ पुस्तक लाँच
मुंबई, दि . 20 – भारतातीलआघाडीचे मतदान व निवडणुका विश्लेषक आणि अक्सिस माय इंडियाचे सीएमडी प्रदीप गुप्ता यांनी ‘हाउ इंडिया व्होट्स : अँड व्हॉट इट मीन्स’ या आपल्या नव्या पुस्तकाच्या लाँचची घोषणा केली आहे. या पुस्तकात भारतीय निवडणुकांचे स्वरुप आणि भारतीय कशाप्रकारे व का त्यांचे राजकीय नेते निवडतात याचा उलगडा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात घेतलेल्या मुलाखती आणि विश्लेषणातून त्यामागचे सत्य मांडण्यात आले आहे.
जॉगरनॉट यांनी प्रकाशित केलेल्या गुप्ता यांच्या या दुसऱ्या पुस्तकात निवडणुकांमधील टोकाची मते आणि जीडीपीचा होणारा परिणाम, भारतीय राजकारणावरील स्मार्ट फोन्सच्या परिणामाची भूमिका, काही राज्यांत स्त्री मतदारांच्या लक्षणीय भूमिकेला असलेले महत्त्व आणि इतर महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहेत.
हे पुस्तक विचार करायला लावणारे, आनंद देणारे, शिक्षित करणारे असून त्यात निवडणुकांच्या निकालांचे सखोल आकलन, मतदारांच्या भावना आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील आव्हाने यांचे इत्थंभूत विश्लेषण मांडल्याबद्दल राजकीय, शैक्षणिक आणि मीडिया अशा विविध वर्तुळांतून त्याची प्रशंसा केली जात आहे.
या लाँचविषयी अक्सिस माय मीडियाचे सीएमडी श्री. प्रदीप गुप्ता म्हणाले, ‘कित्येकदा भारतीय निवडणुकांचे विविध आयाम पूर्णपणे समजून घेतले जात नाहीत. भारत तसेच परदेशातील बहुतेक निरीक्षक भारतातील निवडणुका जगातील इतर कोणत्याही प्रदेशापेक्षा जास्त गुंतागुंतीची असल्याचे कौतुक करतात, मात्र बऱ्याचदा अनुभवी तज्ज्ञांनाही ही गुंतागुंत पूर्णपणे समजून घेता येत नाही. या पुस्तकात भारतीय निवडणुकांचे सखोल विश्लेषण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला असून त्यासाठी जनतेची विचारसरणी तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातील एक्झिट पोल्स जाणून घेण्यात आले आहेत. यामधे सामान्य माणसाचे राजकीय, आर्थिक तंत्रज्ञानविषक आणि सामाजिक पैलू मांडण्यात आले आहेत व या घटकांचा मतदानाशी संबंधित त्यांच्या मानसिकतेवर कसा परिणाम होतो हे अधोरेखित करण्यात आले आहे. मला आशा आहे, की हे पुस्तक वाचकांना आपल्या देशातील निवडणुकांच्या विविध पैलूंची अंतर्गत माहिती व ज्ञान देईल.’
2014 पासून गुप्ता आणि अक्सिस माय मीडिया हे एक्झिट पोल विश्लेषणातील मापदंड समजले जातात. त्यांचे हे पुस्तक मतदाराची मानसिकता समजून घेण्याच्या त्यांच्या सुफल प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. ही मानसिकता समजून घेण्यासाठी त्यांच्या प्रसिद्ध निवडणूक अंदाज मॉडेलचा वापर करण्यात आला आहे. हे मॉडेल नुकतेच प्रतिष्ठित हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या अभ्यासक्रमात केस- स्टडी म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. ही केस स्टडी एचबीएसच्या निवडणुकांवर आधारित वर्गातील अभ्यासक्रमाचा भाग आहे. त्यात वैविध्यपूर्ण, वेगवेगळे भौगोलिक प्रदेश असलेल्या, सहा राष्ट्रांशी सामायिक सीमा असणारा, प्रचंड मोठी ग्रामीण लोकसंख्या असलेल्या, 23 भाषा बोलणाऱ्या देशातील जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील निवडणुकांचा यशस्वी अंदाज लावण्याशी संबंधित गुंतागुंत अधोरेखित करण्यात आली आहे.