कोरोना – राज्यात रविवारी ६८ हजार ६३१ नवीन रुग्ण; ५०३ जणांचा मृत्यू
मुंबई – लॉकडाऊनच्या एक आठवड्यानंतरही राज्यात कोरोनावाढीचा वेग वाढल्याचंच समोर आलं आहे. आज राज्यात तब्बल ६८ हजार ६३१ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे, तर ५०३ मृतांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी अर्थातच चिंताजनक आहे. त्यामुळे परिस्थितीला घाबरून न जाता नागरिकांनी नियमांचं पालन केल्यास ही परिस्थिती नक्कीच सुधारू शकेल.
गेल्या २४ तासांत तब्बल ६८ हजार ६३१ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा ३८ लाख ३९ हजार ३३८ वर पोहोचला आहे. तर, आज ५०३ मृतांची नोंद असल्याने आतापर्यंत ६० हजार ४७३ बाधितांनी आपले प्राण गमावले आहेत. आज ४५ हजार ६५४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत ३१ लाख ६ हजार ८२८ रुग्णांना कोरोनावर मात केली आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा असाच वाढत राहिला लवकरच पूर्णत: लॉकडाऊनचा कडक इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, सततच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात कोरोना बाधितांना बेड्स मिळत नाहीत. तर, रेमडेसिव्हिर औषधांच्या तुटवड्यामुळे अतिगंभीर रुग्णांचा प्राण कंठाशी आला आहे. तर, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचीही पुरेशी सोय झालेली नाही.
दरम्यान, महाराष्ट्राप्रमाणेच दिल्ली, गुजरात, तामिळनाडूमध्येही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तमिळनाडूमध्ये १० हजार ७२३ नवे रुग्ण, गुजरातमध्ये १० हजार ३४० नवे रुग्ण, तर दिल्लीत तब्बल २५ हजार ४४६ रुग्ण सापडले आहेत.
पुणे कोरोना अपडेट
- दिवसभरात ६४४३ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात ४७१२ रुग्णांना डिस्चार्ज.
- करोनाबाधीत ७३ रुग्णांचा मृत्यू. २० रूग्ण पुण्याबाहेरील.
- १२५० क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३६७२३७.
- ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५६६३६.
- एकूण मृत्यू -६१०९.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३०४४९२.
- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २४०७२.
