fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

रेमडिसिविर इंजेक्शनचा तुटवडा संपवा अन्यथा तीव्र आंदोलन – रमेश बागवे

पुणे, दि. 16 –  गेले महिन्याभर पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. रूग्णांची संख्या वाढत असताना गंभीर रूग्ण सुध्दा वाढत चाचले आहे. रूग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना रेमडेसिविर इंजेक्शन द्यावे लागत आहे. अचानक कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा झाला आहे.  जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिविर इंजेक्शन तुटवड्याबाबत योग्य निर्णय घेतला नाही तर काँग्रेस पक्षातर्फे पुणेकर नागरिकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी दिला आहे.   

परिस्थितीचा फायदा घेऊन काही लोकांनी त्या इंजेक्शनचा काळा बाजार करण्यास सुरूवात केली. यामुळे काही दिवसांपूर्वी जिल्ह्याधिकाऱ्यांनी निर्णय घेतला की, रूग्णांच्या नातेवाईकांना रूग्णालयांतील डॉक्टर व औषध विक्रेत्यांनी रेमडिसिविर इंजेक्शन आणण्यास सक्ती करू नये आणि रूग्णालयांनीच रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रबंध केला पाहिजे. कोविड रूग्णालयामधील औषध विक्रेत्यांनी आपल्या रूग्णालयांना लागणाऱ्या एकूण रेमडेसिविर इंजेक्शन होलसेलरकडे मागणी करावी त्यांच्या मागण्यांनुसार त्यांना रेमडेसिविर इंजेक्शन पुरविले जाईल असाही त्या आदेशामध्ये लिहिले होते. या निर्णयामुळे किरकोळ औषध विक्रेत्यांना होलसेलरकडून रेमडेसिविर इंजेक्शन विकले जात नाही. असे असताना सुध्दा गेले ५ ते ६ दिवस पुण्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रूग्णालय आणि रूग्णालयातील औषध विक्रेते रूग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन आणण्यास सक्ती करतात त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळविण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. ज्या हेतूसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तो आदेश काढला तो साध्य होत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आजपर्यंत पुण्याला किती रेमडेसिविरचा साठा आला आहे आणि किती वितरण झालेले आहे याचा तपशिल द्यावा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading