Saturday, May 30, 2026
PUNE

फूड बँकेच्या माध्यमातून कोरोना महामारीच्या काळात गरजू व्यक्तींना फूड पॅकेट्स चे वाटप

पुणे, दि. १६ – अन्नसुरक्षा विमा ( फूड इन्शुरन्स) योजनेच्या फूड बँकेच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर कोरोना (Covid 19) महामारीच्या काळात दिव्यांग, गरीब व गरजू व्यक्तींना प्रसादम – फूड पॅकेट्स चे वाटप आज पुणे महानगरपालिकेच्या आवारात पुण्याचे प्रथम नागरिक महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी महापालिका सभागृह नेते गणेश बिडकर, रघुनाथ येमुल गुरुजी, उद्योजक दानेश शाह, नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे व उपायुक्त माधव जगताप , अवनि संस्थेच्या डॉ निवेदिता एकबोटे देखील यावेळी उपस्थित होत्या.

उद्योजक दानेश शाह व परिवार ह्यांच्या माध्यमातून कोरोना (Covid 19) महामारीच्या काळात दिव्यांग, गरीब व गरजू व्यक्तींना भोजनाची सोय व्हावी म्हणून पाचशे गरजूंना पोळी-भाजी व मसाले भाताचे वाटप करण्यात आले. फूड पॅकेट्स बरोबर व्हिटॅमिन ची गोळ्या-औषधे ज्यामध्ये एक महिना पुरेल एवढे व्हिटॅमिन D-3 (Tab Calcigen), व्हिटॅमिन C (Tab Celin), झिंक (Tab Zincovit) तसेच कोरोना पासून संरक्षणासाठी मास्क असे किट देखील देण्यात आले आहे.

फूड पॅकेट्स चे वाटप फिरत्या टेम्पो द्वारे स्वारगेट, भवानी पेठ परिसर व शिवाजी नगर भागात मॉडर्न इन्स्टिट्यूट ऑफ बिझीनेस मॅनेजमेंट, मॉडर्न कॉलेज रोड, शिवाजी नगर, पुणे या ठिकाणी करण्यात येणार आहे.

मानवतेवर आलेल्या या संकटाच्या काळात आम्ही आपणा सर्वांना आवाहन करतो की आपण पुढे येऊन ह्या अन्नदानाच्या सेवेसाठी स्वयंसेवक म्हणून अथवा आर्थिक स्वरूपात मदत देऊन पुढे यावे , जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत अन्नदान करता येईल.

वरील कार्यासाठी डॉ. गजानन एकबोटे, कार्याध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, पुणे व रघुनाथ येमुल गुरूजी, दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading