fbpx
Tuesday, May 7, 2024
MAHARASHTRATOP NEWS

लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही, सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट मत

मुंबई, दि. 10 – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंबंधात या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. ऑनलाईन होणाऱ्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे. संध्याकाळी 5 वा. या बैठकीला सुरुवात झाली आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच तीन आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमका कोणता निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बैठक सुरु होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची साखळी तोडायची असेल तर आता लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही अस ठोस मत व्यक्त केले आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित निर्णय घेण्याची ही वेळ आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तर 15 एप्रिल ते 21 एप्रिलपर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते. ऑक्सिजिनचा तुटवडा जाणवू शकतो. अशी शक्यता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. तर कोव्हिडसाठी 960 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आहे अध्याप 1200 मेट्रिक टन राज्याची उत्पादन क्षमता असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान राज्यात रेमडिसीव्हरचा तुटवडा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

दरम्यान, यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय नसेल, राज्यासाठी एकच निर्णय असेल असं सांगितलं. ते बारामतीत कोरोना आढवा बैठकी नंतर बोलत होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading