आधार सोशल फाऊंडेशनतर्फे ‘देवदूतांचा’ सन्मान

पुणे : आधार सोशल फाउंडेशनच्या वतीने जागतिक आरोग्य दिन व भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त डॉक्टर कोटणीस दवाखाना येथील स्वर्गीय मालती काची प्रसूतिगृह या ठिकाणी असणा-या लसीकरण केंद्रातील डॉक्टर व परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. कोरोना काळात अहोरात्र कार्य करुन आता लसीकरणाच्या माध्यमातून देवदूतांचे कार्य करणा-यांना यानिमित्ताने गौरविण्यात आले.  

याप्रसंगी फाऊंडेशनचे अध्यक्ष व भाजपा शहर उपाध्यक्ष माजी नगरसेवक दिलीप गोविंदराव काळोखे, कसबा मतदार संघाचे सरचिटणीस राजेंद्र काकडे, छगन बुलाखे, अनिल गोविंदराव काळोखे, गणेशराव येनपुरे, सविता काळोखे, पुरण हूडके, सामाजिक कार्यकर्ते राहुल हांडे, प्रतीक मालू, पंकज शेठ, राजू आखाडे, अनिल पवार इत्यादी उपस्थित होते.

डॉ. कोटणीस दवाखाना येथील स्वर्गीय मालती काची लसीकरण केंद्रातील डॉ. सारंग कालेकर, महाडिक साहेब, डॉ. वर्षा कुलकर्णी, मृणालिनी लोंढे, योगिता बारवकर, संपदा कुंभार, अनुराधा पोकळे, आशा सातपुते, दीपक क्षीरसागर, नरेंद्र चव्हाण, तन्वीर शेख, ऋषभ वाघ, स्वप्निल भालेकर, शुभम लोखंडे, लता निकम, राम साळुंखे, सिद्धार्थ पाटोळे, चंद्रकांत साळुंखे, राहुल शेंडगे, विशाल सावंत या लसीकरण केंद्रांमध्ये सेवा देणा-या कर्मचा-यांचा सन्मान करण्यात आला.
दिलीप काळोखे म्हणाले, लसीकरण वेगाने होणे गरजेचे आहे. त्याकरीता वैद्यकीय सेवक अहोरात्र काम करीत आहेत. त्यामुळे लसीकरणाकरता आलेल्या नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन आम्ही स्वागत केले. तसेच लसीकरणाचे महत्त्व, त्याची जनजागृती, लसीकरणानंतर घ्यावयाची काळजी याचे प्रबोधन देखील करण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: