अभिनेत्री मुग्धा गोडसेच्या हस्ते द वेलनेस क्लब जिम एक्स्प्रेसचे उद्घाटन

पुणे, दि. 3 – कमलेश राघवानी यांच्या पुण्यात पिंपरी-चिंचवड च-होली रोड येथील द वेलनेस क्लब जिम एक्स्प्रेस चे उद्घाटन बॉलिवुड अभिनेत्री आणि टॉप फॅशन मॉडेल मुग्धा वीरा गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी कमलेश राघवानी, लता राघवानी आणि नितीन सिंग ठाकुर उपस्थित होते . द वेलनेस क्लब जिम एक्स्प्रेस ही भारतातील एक प्रीमिअम जिम फ्रँचाइज साखळी आहे.

द वेलनेस क्लब जिम एक्स्प्रेस च्या भारतात तीन स्वतःच्या आणि १३ फ्रँचाइज जिम आहेत. अधिक चांगलं आरोग्य, सुलभता, योग्य सामाजिक वातावरण उपलब्ध करून देणा-या उत्साही फ्रँचाइज मालक समुदायाच्या सहकार्याने सदस्यांचा आत्मसन्मान दृढ व्हावा या दृष्टीकोनातून द वेलनेस क्लब जिम एक्स्प्रेस वाटचाल करीत आहे.

उदघाटन समारंभात मुग्धा ने फिटनेस च्या टिप्स दिल्या आणि सदैव फिट आणि उत्साही असण्याचं महत्त्व सांगितलं. सकस अन्न आणि व्यायाम या दोन रोगांचा प्रतिकार करण्याची क्षमता विकसित करण्याचे दोन मार्ग आहेत. नेमाने व्यायाम करून आपलं शरीर गतिमान ठेवा आणि एका ठराविक वेळापत्रकानुसार शिस्तीने आपले व्यवहार करा, असं ती म्हणाली. व्यायामाला स्ट्रेचेस, चालणे आणि योगा यांची जोड देऊन तुम्ही फिट आणि सुबक राहू शकता, असंही तिनं सांगितलं. नियमित शारीरिक हालचाली मुळे शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहतात, असं मुग्धाला म्हणाली. यातूनच नैराश्य येणं किंवा संवेदना दुर्बल होणं हा धोका कमी होतो आणि स्मृतिभ्रंश लांबणीवर पडतो आणि स्वतःबद्दल एक आनंदी भावना वाढीला लागते.

द वेलनेस जिम इक्विपमेंट चे भागीदार नितीन सिंग ठाकुर म्हणाले, आमच्या येथील कार्यसंस्कृतीचे काही ठळक आधुनिक घटक आहेत. आम्ही आमचे उद्दिष्ट आणि दृष्टिकोन सर्वाना समजावून सांगतो आणि त्याबद्दल आमचे कर्मचारी, फ्रँचायजी आणि भागीदार या सर्वाना सखोल जाणीव करून देतो. द वेलनेस हा भारतातील नफ्यात चालणा-या जिम ब्रॅण्ड्स पैकी एक आहे. राहुल देव आणि मुग्धा गोडसे हे आमचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. सर्वांच्याच फिटनेस च्या गरजा पूर्ण करण्याचा आमच्या ब्रँड चा प्रयत्न असतो. रोगप्रतिकार करण्याची क्षमता पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे आणि ताकद वाढवणे आणि हृदयाचे कार्य उत्तम ठेवणे यासाठीचे व्यायाम पुन्हा एकदा महत्त्वाचे झाले आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: