राजेश विटेकर यांनी तृप्ती देसाईचे आरोप फेटाळले….

परभणी, दि. 1 (प्रतिनिधी) ः केवळ ब्लॅकमेल करण्यासाठीच आपल्यावर आरोप केला जात असल्याचा, आपली राजकीय कारकीर्दीला ग्रहण लावण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांनी माध्यमांशी बोलतांना केला.

आज गुरुवारी (दि.एक) दुपारी पुण्यात त्यांच्यावर एका पत्रकार परिषदेतून संबंधीत महिला व सामाजिक कार्यकर्ते देसाई यांनी अत्याचाराच्या संदर्भात आरोप केले. त्या बद्दल बोलताना विटेकर यांनी आपल्याकडे यासंदर्भात अनेक पुरावे आहेत. आपल्याला विनाकारण या प्रकरणात गोवले जात आहे, असे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात आपण गंगाखेडच्या न्यायालयात याचिका दाखल केली आहे.. कोणत्याही पद्धतीने माझ्यावर कोणी आरोप करु शकत नाही, असेही ते म्हणाले. वकिलांशी बोलून उद्या आपण भुमिका म्हणणे मांडू असेही ते म्हणाले .

Leave a Reply

%d bloggers like this: