fbpx
Wednesday, April 24, 2024
PUNETOP NEWS

PMP – कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे 492 बसफेऱ्या होणार रद्द

पुणे, दि. 31 – पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे  रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या सध्या संचलनात असलेल्या तेरा डेपोंच्या एकूण १५०० बसेस आहे तशाच संचलनात राहतील. मात्र या १५०० बसेसच्या सकाळपाळीत पहाटे लवकर सुरू होणाऱ्या व दुपारपाळीतील रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या एकूण ४९२ खेपा रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी याबाबतची माहिती दिली.

सकाळपाळीतील १३१ शेड्युलच्या २६२ खेपा व दुपारपाळीतील ११५ शेड्युलच्या २३० खेपा अशा एकूण ४९२ खेपा रद्द करण्यात आल्या आहेत. संचारबंदीच्या वेळेत असलेल्या ४९२ खेपा रद्द करून बसेसची संख्या आहे तेवढीच म्हणजेच १५०० इतकी ठेवून प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली आहे. सकाळपाळीतील पहाटे लवकर सुरू होणाऱ्या व दुपारपाळीतील रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या ओ. टी. च्या बसेसच्या पहिल्या व शेवटच्या खेपा रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे एकूण ३६७.३० तास ओ.टी. रद्द होऊन यातून परिवहन महामंडळाची आर्थिक बचत देखील साधली जाणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading