कोरोना – राज्यात बुधवारी तब्बल 39 हजार 544 नवे रुग्ण, तर मृतांचा आकडा 200 पार ; पुण्याची चिंता वाढली

मुंबई : संपूर्ण देश कोरोना महामारीमुळे त्रस्त आहे. महाराष्ट्रात तर ही परिस्थिती जास्तच गंभीर आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल 39544 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर आज मृतांचा आकडासुद्धा लक्षणीयरीत्या वाढला असून दिवसभरात राज्यात तब्बल 227 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.34 टक्के असून मृत्यूदर 1.94 टक्क्यांवर पोहोचलाय. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 28,12,980 वर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 24,00,727 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबई जिल्ह्यात बाधितांचा आकडा 41,47,773 वर पोहोचला आहे. मुंबईत एकूण 352163 रुग्ण बरे झाले असून येथे आतापर्यंत 11,690 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई जिल्ह्यात सध्या 49953 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे.

ठाणे जिल्ह्यातसुद्धा कोरोना रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे. येथे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास प्रशासनाला यश येत नाहीये. ठाण्यात बाधितांचा आकडा 3,39,590 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत येथे 293897 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत 5970 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून सध्या येथे 39,692 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

पुणे जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती तर अतिशय विदारक आहे. येथे सध्या 64277 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 8325 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर पुण्यात बाधितांचा आकडा 536262 वर पोहोचला असून येथे आतापर्यंत 463611 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबई शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला

मुंबई शहरात आज दिवसभरात 5,394 संशयितांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. येथे दिवसभरात 3,130 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आज दिवसभरात मुंबईत 15 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 4,14,714 वर पोहोचला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 3,50,660 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 51,411 सक्रिय कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु असून येथे आतापर्यंत 11,686 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे कोरोना अपडेट

  • दिवसभरात उच्चांकी 4458 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात 3374 रुग्णांना डिस्चार्ज.
  • करोनाबाधीत 32 रुग्णांचा मृत्यू. 11 रूग्ण पुण्याबाहेरील.
  • 799 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 269343
  • ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 33858
  • एकूण मृत्यू – 5302

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 230183

  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 16446

Leave a Reply

%d bloggers like this: