प्रशांत गोपीनाथ यांची कोहिनूर ग्रुपच्या संचालक, कमर्शियल बिझनेस युनिट पदी नियुक्ती

पुणे, दि. ३१ – बांधकाम व्यवसाय, विद्यार्थी वसतीगृहे, औद्योगिक संकुलांची निर्मिती व बांधकाम तंत्रज्ञान आदी व्यवसायांमध्ये नावलौकिक असलेल्या पुण्यातील कोहिनूर समूहाच्या संचालक – कमर्शियल बिझनेस युनिट पदी प्रशांत गोपीनाथ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी लोढा डेव्हलपर्स आणि शापूरजी पालोनजी समूहामध्ये कमर्शियल रिअल इस्टेट बिझिनेस विभागाचे प्रमुख म्हणून प्रशांथ गोपीनाथ कार्यरत होते.

कोहिनूर समूहामध्ये कमर्शियल बिझिनेस युनिटला धोरणात्मक दिशा प्रदान करीत समूहाच्या व्यवसाय वृद्धीसाठी आता ते प्रयत्नशील असणार आहेत. व्यवासायिक – निवासी बांधकाम प्रकल्पांची विक्री व ते भाडेतत्त्वावर देणाच्या विषयात प्रशांत   गोपीनाथ यांचा प्रदीर्घ अनुभव असून, याआधी त्यांनी डीएलएफ आणि एचडीएफसी सारख्या अन्य प्रमुख रिअल इस्टेट ब्रँडसोबत देखील काम केले आहे. याबरोबरच पुणे, मुंबई, चेन्नई, नागपूर, मोहाली, मनेसर, कलकत्ता आणि भारतभरात आजवर १ कोटी स्केअर फूट इतक्या विविध टप्प्यातील बांधकामाचे नेतृत्व करून त्याच्या विक्री व भाडेतत्वावरील देण्याच्या प्रक्रियेचे देखील प्रमुख म्हणून ते कार्यरत होते.

बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या पीई व्यवहारांचा ते अविभाज्य भाग असून त्यांनी आजवर अॅमेझॉन, असेंचर, वर्ल्ड बँक, आयबीएम, एडीपी, फोर्ड, एरीक्सॉन, डब्लूएनएस, अॅमडॉक्स, वोडाफोन, डेलॉईट, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आदिंसोबतही काम केलेले आहे. भारताबाहेर अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, जर्मनी, डेन्मार्क, सिंगापूर याबरोबरच युरोप व दक्षिण पूर्व आशियायी बाजारपेठेतील अनेक संस्थांसोबत देखील त्यांनी व्यवहार केले आहेत.

प्रशांत गोपीनाथ हे आयआयएम बंगळूरूचे माजी विद्यार्थी असून त्यांनी वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मधून एमबीए तर कोचीन युनिवर्सिटी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी येथून आपले बी. टेक (मेकॅनिकल)चे शिक्षण पूर्ण केले आहे.

आपल्या नियुक्ती विषयी बोलताना प्रशांत गोपीनाथ    म्हणाले, “कोहिनूर समूह हा विश्वासावर उभा असलेला समूह असून त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणे माझ्यासाठी आनंदाची गोष्टी आहे. झिरो डेब्ट मॉडेलवर मार्गक्रमण करणा-या देशातील निवडक संस्थांमध्ये कोहिनूर समूहाचा समावेश आहे. पुढील पाच वर्षांत ५० ते ७० लाख स्केअर फुटांचे बांधकाम करण्याचे समूहाचे ध्येय असून यामध्ये एक महत्त्वाचा भाग होणे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आश्वासक जागांवर जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारणे हे समूहाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या या प्रवासात सहभागी होण्यास मी देखील उत्सुक आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: