महात्मा फुले यांचा अपमान करणाऱ्या लोकसेवा अकॅडमी वर कारवाईची मागणी
पुणे, दि. २८ – स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांचा अपमान करणाऱ्या लोकसेवा अकॅडमीच्या शिक्षकावरमाळी सेवा संघाच्या वतीने गुन्हा दाखल करून सदर अकॅडमी कायम स्वरूपी बंद करण्यात यावी यामागणीसाठी माळी सेवा संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले. तसेच या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी अकॅडमीच्या फलकाला संतप्त कार्यकर्त्यांनी काळे फासले. विश्रामबाग पोलीस स्टेशन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार शुभांगी गोंजारे यांच्या कडे माळी सेवा संघाच्या वतीने कारवाई संदर्भात निवेदन देण्यात आले.
यावेळी माळी सेवा संघाचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ माळी, पुणे शहर महिला आघाडी अध्यक्षा सुरेखाताई होले, पुणे जिल्हा महिला संघटक उर्मिलाताई भुजबळ, इंदापूर तालुका अध्यक्ष बापुसाहेब बोराटे, महिला आघाडी अध्यक्षा कौशल्याताई राऊत, प.महा. वधु वर सूचक महिला अध्यक्षा सविता रायकर, हडपसर महिला आघाडी अध्यक्षा पुष्पाताई शेवते, पिंपरी चिंचवड कार्यअध्यक्ष चंद्रकांत वाघोले व खडकवासला अध्यक्ष संतोष माळी यांच्यासह माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
