कोरोना – आज तब्बल ३१ हजार ८५५ नव्या रुग्णांची वाढ, पुण्यात साडे ३ हजारांहून अधिक रुग्ण

मुंबई – राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णावाढीचा वेग झपाट्याने वाढत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कमी झालेली रुग्णसंख्या आज पुन्हा वाढली. आज तब्बल ३१ हजार ८५५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मुंबईसह आजूबाजूच्या अनेक शहरात रुग्णसंख्या वाढल्याने राज्याची रुग्णसंख्या वाढली. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला असून राज्यात आणखी कडक निर्बंध लादण्यात शक्यता आहे.

आज राज्यात ३१ हजार ८५५ नव्या रुग्णांची वाढ झाली. तर, आज १५ हजार ०९८ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण २५ लाख ६४ हजार ८८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, आज ९५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने आतापर्यंत ५३ हजार ६८४ रुग्णांनी जीव गमावला आहे. तर, सध्या राज्यात २ लाख ४७ हजार २९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुणे शहर

  • दिवसभरात ३५०९ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात १४१० रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत ३३ रुग्णांचा मृत्यू. ९ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • ५८९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २४४३४३.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २६५१५.
  • एकूण मृत्यू -५११४.
    -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २१२७१४.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १६१८५.

Leave a Reply

%d bloggers like this: