४६ वर्षीय रुग्णावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी

पुणे, दि. २३ -वी मुंबईत राहणारे ४६ वर्षांचे राजेश यांच्यावर अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई या जेसीआयने प्रमाणित केलेल्या मल्टी-स्पेशालिटी क्वाटरनरी केयर हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना ५२ वर्षांच्या  मृत महिलेचे हृदय दान करण्यात आले आहे.  हार्ट फेल्युअरमुळे गंभीर आजारी असलेला हा रुग्ण गेले सहा महिने प्रतीक्षा यादीवर होता. या कालावधीत इन्ट्रॅक्टेबल हार्ट फेल्युअरमुळे तब्बल आठ वेळा त्यांना रुग्णालयात भरती व्हावे लागले होते. प्रत्येक वेळी त्यांचा जीव जरी वाचवला गेला होता तरी हृदय प्रत्यारोपण ही त्यांच्यासाठी एकमेव आशा होती. मुंबईमध्ये हृदय उपलब्ध होत नसल्याने त्यांनी हृदय प्रत्यारोपणासाठी चेन्नईला जाण्याचे ठरवले. पण मुंबईमध्ये हृदय दाता उपलब्ध होत असल्याचे समजताच त्यांना चार तासांत मुंबईत आणण्यात आले व अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी चार तासात यशस्वीपणे पार पडली.

अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे हार्ट अँड लंग ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. संजीव जाधव यांनी सांगितले, श्री. राजेश जेव्हा अपोलो हॉस्पिटल्समध्ये आले तेव्हा त्यांना डायलेटेड कार्डीओमिओपॅथीचा त्रास होत होता, त्यांचे हृदय गेली पाच ते सहा वर्षांपासून फक्त २०% चालत होते. हृदयाचे कार्य ३५% पेक्षा कमी प्रमाणात सुरु असल्यास त्याला अति जोखीम मानले जाते, यामुळे अतिशय गंभीर अऱ्हिथमिया होतो आणि हृदय बंद पडू शकते. ऑटोमेटेड कार्डीओव्हर्टर डेफिब्रिलेटर पेसमेकर बसवण्यात आले होते जेणेकरून हृदयाला इलेक्ट्रिकल गती देता येईल आणि कोणताही बदल झाल्यास ते पुन्हा सामान्य ऱ्हिदममध्ये येईल. 

राजेश यांनी त्यांना दान करण्यात आलेले हृदय आणि दात्याच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांना हे नवे जीवन मिळाले आहे त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी सांगितले, अपोलो हॉस्पिटल्सला येण्याच्या आधी मी बरा होईन ही आशा जवळपास सोडून दिली होती. डॉक्टर्स आणि त्यांच्या टीमने माझी आशा भक्कम केली आणि जेव्हा माझे हार्ट फेल्युअर झाले तेव्हा अनेकदा माझे प्राण वाचवले. डॉ. संजीव जाधव आणि त्यांच्या संपूर्ण टीमची सकारात्मक वृत्ती माझ्या उपचारांमध्ये आणि हृदयासाठी वाट बघण्याच्या काळात माझा आधारस्तंभ बनून उभी राहिली. रुग्णालय, डॉक्टर्स आणि दात्याच्या कुटुंबियांचा मी अतिशय आभारी आहे, त्यांनी मला नवे जीवन मिळवून दिले. मी लवकरच माझ्या कुटुंबाकडे आणि सर्वसामान्य जीवनाकडे परत जाण्यासाठी आतुर आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: