रेड एफएम कडून सुपरहिट मराठी चित्रपट महोत्सवाची घोषणा

पुणे –भारतातील सर्वात मोठे व सर्वाधिक पुरस्कारांनी गौरवले गेलेले रेडीओ नेटवर्क ९३.५ रेड एफएम. सुपरहिट्स मराठी चित्रपट महोत्सवाच्या दुसर्‍या पर्वाची घोषणा करत आहे. या डिजिटल स्वरुपातील महोत्सवातून आम्ही मराठी चित्रपटांची गौरवशाली परंपरा साजरी करत आहोत. २७ मार्च पासून आपण या महोत्सवाचा आनंद घेऊ शकता आपल्या आवडत्या आर. जे. – कल्लाकर श्रुतिसोबत! आणि या महोत्सवात दाखवले जातील  कॉमेडी, ड्रामा, रोमान्स अशा विविध प्रकारचे २० अर्थातच सुपरहिट चित्रपट !

हा महोत्सव मल्टी विंडो प्लॅटफॉर्म  वर असल्यामुळे प्रेक्षकांना मिळेल त्यांच्या आवडीचे चित्रपट पाहण्याची संधी. जगावर ओढवलेले वर्तमान संकट पाहता रेड एफएम. ने आपल्या श्रोत्यांच्या सुरक्षिततेसाठी हा महोत्सव  ऑनलाईन  करण्याचे ठरवले आहे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व चाहत्यांना या महोत्सवाचा आनंद घरबसल्या विनामूल्य घेता येणार आहे.

या विषयी बोलताना रेड एफएम. आणि मॅजिक एफएम. च्या संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निशा नारायणन म्हणाल्या, वर्तमानकाळात प्रादेशिक चित्रपटांनी उत्तम व्यवसाय केला आहे व विशेषतः मराठी चित्रपटांनी प्रादेशिक भाषांतील चित्रपटांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आम्ही दोन आठवड्यांपूर्वी या चित्रपट महोत्सवाची घोषणा केली आणि त्याला मिळालेला प्रतिसाद हा थक्क करणारा होता. या महोत्त्सवाचे हे दुसरे पर्व आहे आणि वर्तमान परिस्थितीमुळे आम्ही हा महोत्सव ऑनलाईन  करत असलो तरीही याला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद हा गेल्यावेळेपेक्षा अधिक आहे व त्यासाठी आम्ही आमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व श्रोत्यांचे ऋणी आहोत. या वर्षी मराठी चित्रपटविश्वातील काही मोठी नावेही सुपरहिट मराठी चित्रपट महोत्सवाशी जोडली गेली आहेत त्यामुळे या महोत्सवाची भव्यता अधिकच वाढेल यावर आमचा विश्वास आहे.

या महोत्सवात सुपरहिट चित्रपटांव्यतिरिक्त त्या चित्रपटाशी संबधित पडद्यामागील गमतीजमती, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक ख्यातनाम अभिनेते अभिनेत्रींनी सांगितलेले रंगतदार किस्से अशा अनेक रंगतदार घटनांनी हा महोत्सव सर्व श्रोत्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल यात शंका नाही. या महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी marathifilmfestival.in वर नावनोंदणी करणे आवश्यक आहे.–

Leave a Reply

%d bloggers like this: