PMP मध्ये 50 टक्के प्रवाशांनाच परवानगी – महापौर
पुणे : शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पीएमपीच्या बसेस आता क्षमतेपेक्षा निम्म्याच प्रवाश्यांची वाहतुक करणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कार्यवाही केली जाणार आहे.
शहरातील काेराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असुन, यामुळे सार्वजनिक वाहतुक व्यवस्था असलेल्या पीएमपीच्या सेेवेवर निर्बंध आणले गेले आहे. बसमध्ये आणि बसथांब्यावरील प्रवासी संख्या कमी करावी अशी सुचना जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून पीएमपी प्रशासनाला केल्या गेल्या हाेत्या.
पीएमपीच्या सर्व मार्गावरील बसेसमध्ये बसच्या सिटींग व स्टॅण्डींग क्षमतेच्या ५० टक्के प्रवाश्यांनाच परवानगी देण्यात येणार आहे. तसेच पुणे महापािलका आयुक्त विक्रम कुमार यांनीही याविषयी पीएमपीला कळविले हाेते. याची अंमलबजावणी करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने संबंधितांना आदेश दिले आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझेशन बाबत नियमांचे पालन करावे. बसमध्ये बसच्या आसन क्षमतेच्या ५०% प्रवासी घेणे, स्थानकावरील कंट्रोलर कम चेकर सेवकांनी बसमध्ये गर्दी असल्यास प्रवाशांना पुढील बसमध्ये बसण्याची व्यवस्था करावी, कंट्रोलर कम चेकर सेवकांनी प्रवाशांना बस थांब्यावर सुरक्षित अंतरावर थांबण्याच्या सुचना द्याव्यात, सर्व चालक-वाहक सेवकांनी मास्क वापरावा, मास्क शिवाय प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये, बसमध्ये सॅनिटायझरने भरलेली बॉटल सुस्थितीत स्टॅण्डमध्ये ठेवलेली असावी, इतरत्र ठेवण्यात येऊ
नये, प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेवणेबाबत मार्गदर्शन करावे, दैनंदिन जास्तीत जास्त बसेस गर्दीच्या वेळेस मार्गावर पाठविण्यात याव्यात, बसेस स्वच्छ धुऊन सॅनिटाईज करण्यात याव्यात अशा सुचना दिल्या आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी करून प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेवणेबाबत मार्गदर्शन करावे असे आदेश पीएमपी प्रशासनाने दिले आहेत.
