हेमंत नगराळे यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती

मुंबई – पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार बॅकफूटला गेल्याचे चित्र आहे. सचिन वाझे यांच्या निलंबनानंतर झालेल्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांच्याकडील गृहखातं जाणार किंवा मुंबई पोलीस आयुक्तांची बदली होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. आजअखेर अनिल देशमुख सेफ असून मुंबई पोलीस आयुक्त बदलल्याचे स्पष्ट झालं.

गृहमंत्री देशमुखांना हटविण्याची मागणी जोर धरत असताना पोलीस आयुक्तांना बदलण्याची चर्चा काल सुरू होती. मंगळावीर मध्यरात्रीपर्यंत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत हायव्होल्टेज बैठकी सुरू होत्या. अखेर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाल्याचे आज निश्चित झाले. त्यांच्या जागी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची वर्णी लागली आहे. खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच ही माहिती दिली.

रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी दिली आहे. तर परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: