‘पाय डे’ चे औचित्य साधून रंगला ‘लिलावती’ ग्रंथावरील वेबिनार !

पुणे : ‘गणितासारखा रुक्ष विषय भास्कराचार्यांनी संस्कृत कवितेच्या रूपात,प्राण्यांची नावे गुंफून मांडला .अपूर्णांक ,भागाकार ,वर्गमूळ अशा उदाहरणांसह मांडली . हा गणित आणि साहित्याच्या संदर्भात जगातील एक आगळा प्रयोग होता ‘,असे प्रतिपादन गणित संशोधक, अभ्यासक डॉ. सुधाकर आगरकर यांनी केले .

‘अंकनाद ‘ या गणिताची गोडी लावण्याकरिता तयार करण्यात आलेल्या अॅप कडून थोर भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्यांच्या ‘ लिलावती ‘ या ग्रंथावरील वेबिनार मध्ये ते बोलत होते . रविवार १४ मार्च हा ‘पाय डे ‘ होता . ‘पाय ‘या गणितातील संकल्पनेचा दिवस होता . हे औचित्य लाभलेला हा वेबिनार चांगलाच रंगला .

‘अंकनाद ‘ या गणिताची गोडी लावण्याकरिता तयार करण्यात आलेल्या अॅप कडून थोर भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्यांच्या ‘ लिलावती ‘ या ग्रंथावर गणित संशोधक, अभ्यासक डॉ. सुधाकर आगरकर यांच्या मासिक वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. १३ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पहिले व्याख्यान सत्र पार पडले . १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता या वेबिनार मालिकेचा दुसरा भाग सादर झाला . वर्षभर हा उपक्रम दरमहा दुसऱ्या शनीवारी, दुसऱ्या रविवारी चालणार आहे.

आजच्या वेबिनारमध्ये प्राची साठे यांनी प्रास्ताविक केले . मंदार नामजोशी,पराग गाडगीळ ,निर्मिती नामजोशी ,समीर बापट यांच्यासह विद्यार्थी ,शिक्षक ,संशोधक सहभागी झाले .

डॉ सुधाकर आगरकर म्हणाले ,’लीलावती या कन्येसाठी भास्कराचार्यांनी हसत खेळत गणिते ही कोडी सोडवायला दिल्यासारखी दिली आणि ती रंजक झाली . १८ व्या शतकापासून लीलावती ‘ ग्रंथाची इंग्रजीत भाषांतरे सुरु झाली. भारतीय तसेच परदेशी संशोधकांनी ही भाषांतरे केली . १८८९ मध्ये संस्कृत लिलावतीचे मराठीत भाषांतर झाले. भास्कराचार्यांनी पुस्तकात एकही गणित सोडवून दाखवलेले नाही .तयार उत्तरे दिली नाहीत . मात्र,पद्धती शिकवल्या . जपानी संशोधक म्हणतात त्याप्रमाणे भारतातील घराघरात या ग्रंथाचे वाचन व्हायला हवे .

Leave a Reply

%d bloggers like this: