MPSC परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी संतप्त

पुणे, दि. 11 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलली आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेबाबत लोकसेवा आयोगाच्या परिपत्रकात काही सांगण्यात आलेले नाही. आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे. त्यामुळे पुण्यात नवी पेठेत संतप्त विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला आहे.

11 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा मराठा आरक्षणप्रश्नी मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती.त्यानंतर आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुन्हा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेली परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. संतप्त विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन छेडले असून रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: