Saturday, May 30, 2026
MAHARASHTRATOP NEWS

MPSC परीक्षेची तारीख उद्या जाहीर करणार: परीक्षा ८ दिवसात घेणार – मुख्यमंत्री

मुंबई, दि. ११ – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी MPSC (राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२०) पुढे ढकलण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रक प्रशासनाने जारी केले होते. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकल्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन केले. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी येत्या ८ दिवसांत एमपीएससीची परीक्षा घेण्यात येईल असे वचन दिले आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात आली नाही या परीक्षेचे उद्या शुक्रवारी मुख्य सचिव सिताराम कुंटे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करु नये कोणत्याही परीस्थितीत विद्यार्थ्यांची वयोमर्यादा आड येणार नाही. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यात येईल. तसेच परीक्षेसाठी उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परंतु येत्या आठ दिवसांत ही परीक्षा होणार असे वचन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिले आहे. याबाबत उद्या तारीख घोषित करण्यात येणार आहे. परीक्षार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टिने हा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा देताना पाणी देणारा, सुपव्हिजन करणारा कर्मचारी हा कोरोना बाधित तर नाही ना अशा दडपणाखाली विद्यार्थी नसायला पाहिजे यासाठी सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. कोरोना चाचणी केलेला कर्मचारी आणि कोरोना लस घेतलेलाच कर्मचारी परीक्षा घेण्यास उपस्थित राहील अशी सुचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

एमपीएससी पुढे ढकल्याने विद्यार्थ्यांनी कोणाच्याही बोलण्यात येऊ नका, विरोधकांकडून विद्यार्थ्यांना भडकवण्यात येत आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेऊन एमपीएसीची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तयारीला लागावे आपला अभ्यास सुरु ठेवावा असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading