शिवसेना महिला आघाडीने केला महिला सन्मान

पुणे:- विविध क्षेत्रांत ठसा उमविणाऱ्या प्रतिभावंत महिलांचा शहर महिला आघाडीच्या संघटिका सविता मते यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सुमन दरेकर, लिज्जत पापड, राजश्री काळे, भगिनी बँक, आशा राऊत, सहायक आयुक्त घोले रोड क्षत्रिय कार्यालय, सुषमा लाबे पोलीस अधिकारी, आशा खोमणे, परिमंडळ अधिकारी, उमा बांगर, शीतल बरखंडे, अमृता वीर, संजय गांधी महिला निराधार योजना डॉ सुनिता सोमण, शिवाजीनगर तलाठी गीताश्री काळे  यांचा शाल,श्रीफळ,समृत्तिचिन्ह,गुच्छ आणि पेढे देऊन सन्मानित करण्यात आला.

कोविडच्या काळात विविध क्षेत्रातील रणरागिनींनी समाजाला धीर देणारी कौतुकास्पद कामगिरी केली. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे मते यांनी सांगितले. बालगंधर्व येथे उद्या होणारा कार्यक्रम वाढता कॉविड मुले रद्द करून आज त्या त्या भागात कार्यक्रम करण्यात आला.

सीमा वरखाडे, नयना वाघ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. कलावती घाणेकर,प्रज्ञा लोणकर, करुणा घाडगे, पौर्णिमा बहिरट,भागश्री सगवेकर, दीपाली शिगवण, बानो शेख, स्नेहल पाटोळे, लक्ष्मी पालकर आदी उपस्थीत होते.

Leave a Reply

%d bloggers like this: