महाविकास आधाडी सरकार काळात राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी – गोपाळदादा तिवारी

पुणे दि १० – तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री हे नागपूरचे असतांनाच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जस्टीस लोया यांचा नागपूर मध्येच “हत्येचा आरोपाचा मृत्यू” (१डीसें.२०१४) पासून, कॅा. गोविंद पानसरे यांचा खून (२०फेब्रू१५), कोपर्डी येथील दुर्दैवी घटना(१३जुलै१६),
भीमा कोरेगाव दंगल प्रकरण(१जाने१७) व नागपूर मधील वाढती गुंडगिरी* हे सर्व फडणवीस सरकारच्याच् कारकिर्दीत घडले व *राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण सर्वाधीक झाले याचे विस्मरण देखील तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना झाले काय..? असा सवाल प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सोशल मीडियावर उपस्थित केला आहे.

राज्यात बालके व महीलांवरील गुन्हेगारीचे प्रमाण ‘महाविकास आधाडी’ सरकार आल्यापासून सु ३०% नी कमी झाले..! ही वस्तुस्थिती नजरेआड करू शकाल काय…? राज्यातील ‘गुन्हेगारीचा ‘प्रमाण’दर’ कमी झाल्याची नोंद तरी किमान ‘विशेष-जागरूक’ विरोधी पक्ष नेत्यांच्या ठायी असली पाहीजे..! आता कोणाचे ‘थोबाड’ नव्हे तर ‘तोंड’ काळे झाले म्हणायचे’…(?) असा सवाल राज्य काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी विरोधीपक्ष नेते यांना केला आहे. पण आम्ही ‘तसे म्हणणार नाही’, कारण आमचे ‘ते संस्कार’ नाहीत, अशी पृष्टीही त्यांनी केली..!
#जस्टीस_लोया मृत्यू ते कॅा पानसरे खून, कोपर्डी घटना, भीमा_कोरेगाव दंगल हे सर्व केंव्हा घडले..? महाविकासआधाडी’ आल्यावर गुन्हेगारी ३०% कमी झाली..! आता कोणाचे ‘थोबाड’ नव्हे तर ‘तोंड’ काळे झाले म्हणायचे(?) पण आम्ही ‘तसे म्हणणार नाही’, कारण आमचे ‘ते संस्कार’ नाहीत..! @CMOMaharashtra pic.twitter.com/dXNPyyBF3A
— Gopal Tiwarie Pune (@GopalTiwarie) March 10, 2021
सोबत ‘ राज्यातील गृहखात्याची प्रत्यक्ष आकडेवारी’ वर देखील श्री देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास करून आत्मचिंतन करून आत्मक्लेश देखील करावा असे आवाहन देखील गोपाळदादा तिवारी यांनी केले आहे.
