मनसुख हिरेन मृत्यू आणि अंबानींच्या घरासमोर चारचाकीत स्फोटक पदार्थ आढळल्याचा प्रकरणाचा योग्यपणे तपास सुरू – अनिल देशमुख

मुंबई, दि. 8 : मनसुख हिरेन संशयित मृत्यूप्रकरणी भा.दं. वि. कलम 302, 201 आणि 120 बी नुसार अज्ञात व्यक्तिविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटक पदार्थ असलेल्या चारचाकी वाहन सापडल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) तपास योग्यपणे सुरू आहे. तपासाअंती दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषद व विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: