महिला दिनी ‘महिला सक्षमीकरणासाठी ‘मनु सेना ‘स्थापन

पुणे : जेएससी एज्युकेशन ट्रस्ट च्या वतीने महिला सक्षमीकरण, स्वसंरक्षण,प्रशिक्षण,रोजगार मार्गदर्शन यासाठी महिला दिनी ‘मनु सेना ‘ हा मंच स्थापन करण्यात आला. ८ मार्च रोजी ट्रस्ट च्या वनाझ कॉर्नर (कोथरूड ) येथील कार्यालयात सकाळी ११ वाजता या मंचाचे उदघाटन झाले. डॉ अद्वैत देशपांडे यांनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले . यांनंतर एड . चंद्रशेखर सबनीस यांनी स्त्री संरक्षण विषयक कायद्यांची माहिती दिली . तर ओम वाघ यांनी सोशल मीडिया वरील वावरादरम्यान घ्यायची काळजी या विषयी माहिती दिली.

युवती आणि महिलांना कायद्याचे ज्ञान ,स्वसंरक्षण ,शैक्षणिक सबलीकरण ,रोजगार मार्गदर्शन ,आपत्ती व्यवस्थापन अशा विषयांवर सक्षम करण्यासाठी ‘मनू सेना ‘ हा मंच स्थापन करण्यात आला आहे . झाशी राणी लक्ष्मीबाई यांच्या मनकर्णिका नावावरून प्रेरणा घेत ‘मनू सेना ‘ स्थापन करण्यात येत असल्याचे डॉ स्नेहा जोगळेकर, निष्का जोगळेकर यांनी यावेळी सांगितले .

Leave a Reply

%d bloggers like this: