स्वीडन-इंडिया मोबिलिटी हॅकॅथॉनचा समारोप
पुणे, दि. 5 – नुकतेच स्वीडन-इंडिया मोबिलिटी हॅकॅथॉनचा समारोप सोहळा पार पडला. हा कार्यक्रम स्वीडिश इन्स्टिटयूट, मुंबई येथील स्वीडनचे वाणिज्य दूतावास आणि नवी दिल्लीतील स्वीडिश दूतावास यांनी आयोजित केला होता.
विजेत्या आणि भागीदारांचा सत्कार करताना, मुंबईमधील स्वीडनचे वाणिज्य जनरल अॅना लेकवॉल म्हणाल्या की, स्वीडन-इंडिया मोबिलिटी हॅकाथॉनच्या विजेत्यांचे अभिनंदन आणि सहभागी, भागीदार, ज्युरी, मार्गदर्शक, स्वीडिश इन्स्टिटयूट व टीम स्वीडन यांचे मनापासून आभार. या हॅकॅथॉनचा उपयोग दोन्ही देशांतील समविचारी लोकांना जोडण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ म्हणून झाल्याचा मला आनंद आहे.
पुरस्कार वितरण समारंभात बोलताना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, स्वीडिश इन्स्टिटयूटने आयोजित केलेल्या ‘स्वीडन-इंडिया मोबिलिटी हॅकाथॉन – चेंगाईंग द वे वी मोव्ह’ या कार्यक्रमाच्या समारोपच्या निमित्ताने हा निरोप पाठवून मला खूप आनंद होतो आहे. हा हॅकाथॉन एक अभिनव उपक्रम आहे जो स्वीडन आणि भारत केवळ सरकारी पातळीवरच नव्हे तर सर्व भागधारकांच्या सहकार्याने एकत्र कसे काम करु शकतो याचे एक चांगले उदाहरण आहे.
आयआयएम अहमदाबाद, आयआयटी बॉम्बे (एसआयएनई), आयआयटी गांधीनगर, अभियांत्रिकी महाविद्यालय- पुणे, सिम्बायोसिस सेंटर फॉर एन्टरप्रेन्योरशिप अँड इनोव्हेशन – पुणे, अश्या शैक्षणिक संस्था भाग घेतला.