सुर्यदत्ता क्लोदिंग बँकेतर्फे येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाला ५० रजयांची भेट

पुणे, दि. ५ – सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील स्त्री व पुरुष मनोरुग्णांसाठी हाताने शिवलेल्या ५० रजया भेट देण्यात आल्या. सुर्यदत्ता एज्यु-सोशियो कनेक्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत सुर्यदत्ता क्लोदिंग बँकेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, प्रादेशिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अभिजीत फडणीस, उप-अधीक्षक डॉ. गीता कुलकर्णी, समाजसेवा अधिक्षक (मनोविकार) भाऊसाहेब माने, महाएनजीओ फेडरेशनचे अध्यक्ष शेखर मुंदडा, सूर्यदत्ता इन्स्टिटयूट ऑफ फॅशन टेकनॉलॉजीच्या विभागप्रमुख मोनिका कर्वे, प्रा. धनश्री पिसे उपस्थित होते. 

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “सामाजिक कार्य करताना योग्य व्यक्तीला मदत मिळणे गरजेचे असते. एखादा उपक्रम हाती घेतल्यास तो चालू राहायला हवा. त्या उपक्रमाचा फायदा समाजातील विविध घटकांना झाला पाहिजे. त्यातून संस्थेतील कर्मचाऱ्यांना, विद्यार्थ्यांना व समाजाला प्रोत्साहन मिळते. विद्यार्थीदशेतच सामाजिक कार्याची सवय लागली तर राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात आपले योगदान देऊ शकतो.”

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि राष्ट्रभवानेने प्रेरित पिढी घडविण्याचा सुर्यदत्ता ग्रुपचा नेहमीच प्रयत्न असतो. सामाजिक भावनेतून असे उपक्रम सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट गेल्या २२ वर्षांपासून राबवत आहे. शिलाई मशीनचे वाटप, अन्नदान, हमाल व रिक्षाचालक यांना इंग्रजीचे प्रशिक्षण, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, कोरोना योद्ध्यांचा सन्मान असे विविध उपक्रम वर्षभरात राबवले आहेत.”

सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ठळक उपक्रमांची दखल घेऊन भविष्यात रुग्णालयात आणखी चांगले उपक्रम घेण्याचे आवाहन डॉ. अभिजित फडणीस व डॉ. गीता कुलकर्णी यांनी केले. प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनीही सहमती दर्शवत रुग्णालयात सामाजिक उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले.

यावेळी मनोरुग्णांच्या समस्या, त्यांच्यासाठी उपयुक्त विविध उपक्रम राबविण्यात येऊ शकतील, बरे झालेल्या रुग्णांचे पुनर्वसन अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. रुग्णालयाच्या वतीने संस्थेचे या उपक्रमाबद्दल आभार मानण्यात आले. दरम्यान, सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला रुग्णालयासाठी सामाजिक उपक्रम करण्याची संधी दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

%d bloggers like this: