कर्तव्य फाउंडेशनतर्फे मराठी दिनानिमित्त ग्रंथालयास पुस्तके भेट व मान्यवरांचे सन्मान

पुणे – मराठी राजभाषा दिन व कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त कर्तव्य फाउंडेशन तर्फे पुणे कॅम्पातील सिध्दार्थ ग्रंथालयास पुस्तके भेट देण्यात आली.तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डाॅ.विलास आढाव सर , प.महाराष्ट्र रेल्वेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन दुधाणे व सामाजिक कार्यकर्ते मन्सूर शेख यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळेस आयोजक कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे, कार्याध्यक्ष अशोक देशमुख,ग्रंथपाल दिलीप भिकुले,सामाजिक कार्यकर्ते मन्सूर शेख, आकाश ढसाळ,उमेश गायकवाड आदी उपस्थित होते.


पुणे कॅम्पातील छत्रपती शिवाजीमहाराज मार्केट येथील सिध्दार्थ ग्रंथालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात प्रा.डाॅ.विलास आढाव व मोहन दुधाणे यांच्याहस्ते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रा.डाॅ.विलास आढाव व मोहन दुधाणे यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेचे महत्त्व विषद करून संत,साहित्यिक व लेखकांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली व कर्तव्य फाउंडेशनच्या पुस्तके भेट उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास भांबुरे यांनी केले तर दिलीप भिकुले यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: