fbpx
Monday, June 17, 2024
ENTERTAINMENT

भोजपुरी मेगास्‍टार रवी किशन दिसणार मौका-ए-वारदातमध्‍ये

एण्‍ड टीव्‍हीने त्‍यांची आगामी क्राइम आधारित मालिका ‘मौका-ए-वारदात’साठी भोजपुरी मेगास्‍टार रवी किशनची निवड केली आहे. रवीराज क्रिएशन्‍स, हेमंत प्रभू स्‍टुडिओज, एअॅण्‍डआय प्रॉडक्‍शन्‍स आणि स्‍पेसवॉकर फिल्‍म्‍स निर्मित ‘मौका-ए-वारदात’ ही लक्षेवधक साप्‍ताहिक क्राइम मालिका आहे. ही मालिका रहस्‍यमय गुन्‍हेगारी केसेसना दाखवते, ज्‍या प्रेक्षकांच्‍या मनाला विचलित करतील आणि त्‍यांना ‘वास्‍तव कल्‍पनेपेक्षा अपरिचित आहे’ या वाक्‍यावर विश्‍वास ठेवण्‍यास भाग पाडतील. काही कालावधीपासून टेलिव्हिजनपासून दूर असलेल्‍या रवी किशनला पुनरागमन करण्‍याचा आनंद झाला आहे.

या मालिकेबाबत सांगताना रवी म्‍हणाले, ”मला या मालिकेचा भाग होण्‍याचा आनंद झाला आहे. मी विविध गुन्‍हेगारी केसेसना दाखवणार आहे. या केसेस वास्‍तविक घटनांमधून प्रेरित आहेत आणि सर्वात अकल्‍पनीय गुन्‍ह्यांच्‍या विविध कथांना दाखवतात. तसेच गुन्‍ह्यामागील रहस्‍य, हेतू व पद्धतींना सादर करतात. क्राइम आधारित मालिकांनी माझे नेहमीच लक्ष वेधून घेतले आहे. मी अशा मालिकांना लक्षवेधक व माहितीपूर्ण मानतो. यामुळे मला आपल्‍या अवतीभोवती घडणा-या गुन्‍ह्यांचे प्रकार आणि आपण त्‍याबाबत कशाप्रकारे जागरूक व दक्ष राहू शकतो, याबाबत समजते. या शैलीवर आधारित अनेक मालिका बनवण्‍यात आल्‍या आहेत, पण माझ्या मते ‘मौका-ए-वारदात’ ही इतरांपेक्षा वेगळी मालिका आहे. सविस्‍तरपणे संकल्‍पना जाणून घेतल्‍यानंतर मला समजले की, मालिकेमध्‍ये विश्‍वासापलीकडील अविभाज्‍य व अविश्‍वसनीय गुन्‍हेगारी कथांची नवीन वेगळी संकल्‍पना आहे, जी लोकांच्‍या मनात प्रश्‍न निर्माण करेल की ‘हे असे-कसे झाले?’ प्रेक्षक क्राइम मालिका पाहतात तेव्‍हा त्‍यांच्‍या मनात ‘हे कसे घडले’, ‘हे कोणी केले’ आणि ‘पुढे काय घडेल’ असे प्रश्‍न निर्माण होतात. पण ही मालिका त्‍यांना ‘हे कशाप्रकारे घडले’ यापेक्षा ‘हे कोणी केले’ विचारण्‍यास भाग पाडेल. मी मालिका सुरू होण्‍यास अत्‍यंत उत्‍सुक आहे. मालिकेसाठी अथक मेहनत घेण्‍यात आली आहे आणि अर्थातच यामध्‍ये सर्व प्रेक्षकांचे प्रेम, पाठिंबा व आपुलकी आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading