यंदाच्‍या व्‍हॅलेंटाइन्‍स डेला प्रियजनांना उत्तम आरोग्‍याची भेट म्‍हणून बदाम द्या!

दरवर्षी प्रेम, आपुलकी व मैत्रीच्‍या भावनेला साजरे करण्‍यासाठी १४ फेब्रुवारी रोजी व्‍हॅलेंटाइन्‍स डे साजरा केला जातो. सेंट व्‍हॅलेंटाइन यांच्‍याशी समर्पित असलेला हा दिवस जगभरात साजरा केला जातो. लोक खास भावना व विविध भेटवस्‍तूंसह त्‍यांच्‍या प्रियजनांप्रती प्रेम व्‍यक्‍त करतात.

यंदा महामारीमुळे प्रियजनांसाठी बदामांसारख्‍या आरोग्‍यदायी भेटवस्‍तूची निवड करा. ज्‍यामुळे त्‍यांना आनंद होण्‍यासोबत त्‍यांचे आरोग्‍य, रोगप्रतिकार शक्‍ती व स्‍वास्‍थ्‍य दीर्घकाळापर्यंत उत्तम राहण्‍यामध्‍ये मदत देखील होईल. बदामांमध्‍ये जीवनसत्त्व ई, मॅग्‍नेशियम, प्रथिने, रायबोफ्लेविन, झिंक इत्‍यादीं सारखे १५ पौष्टिक घटक आहेत. यामधून हृदयाचे आरोग्‍य[1],[2], त्‍वचेचे आरोग्‍य[3], वजनावर नियंत्रण[4],[5] असे अनेक लाभ मिळण्‍यासोबत रक्‍तातील शर्करेवर नियंत्रण ठेवण्‍यामध्‍ये देखील मदत होते. [6],[7]

आघाडीच्‍या बॉलिवुड अभिनेत्री सोहा अली खान म्‍हणाल्‍या, व्‍हॅलेंटाइन्‍स डे हा प्रि‍य व्‍यक्‍तीप्रती आपुलकी व काळजी दाखवण्‍यासाठी खास क्षण आहे आणि विचारपूर्वक गिफ्ट्स देणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. यंदा मी बदाम भेट देण्‍याचे ठरवले आहे. बदाम उत्तम आरोग्‍यासाठी ओळखले जातात. बदामांमध्‍ये जीवनसत्त्व बी२, जीवनसत्त्व ई, मॅग्‍नेशियम आणि फॉस्‍फरस यासारखे विविध पौष्टिक घटक असतात, जे आरोग्‍यदायी जीवनासाठी मदत करतात. याव्‍यतिरिक्‍त बदामांमध्‍ये कॉपर, झिंक, फॅलेट, लोह व जीवनसत्त्व ई[8] यासारखे रोगप्रतिकार शक्‍तीला साह्य करणारे पौष्टिक घटक देखील असतात, ज्‍यामुळे बदाम हे परिपूर्ण गिफ्ट असून सेवन करणा-यांच्‍या एकूण आरोग्‍यामध्‍ये अधिक भर करतात.

पोषण व स्‍वास्‍थ्‍य सल्‍लागार शीला कृष्‍णास्‍वामी म्‍हणाल्‍या, एकमेकांना भेटवस्‍तू देणे ही व्‍हॅलेंटाइन्‍स डेची प्रथाच आहे. पण यामध्‍ये चॉकलेट्स व इतर गोड मेजवानी अशा भेटवस्‍तूंचा समावेश असतो, जे आपल्‍या आरोग्‍यासाठी चांगले नाही. माझा सल्‍ला असा आहे की, प्रि‍यजनांसाठी भेटवस्‍तू निवडताना असे खाद्यपदार्थ निवडा, जे चविष्‍ट असण्‍यासोबत अनेक आरोग्‍यविषयक लाभ देखील देतील. यासाठी माझा सर्वात सल्‍ला असेल की भेट म्‍हणून बदामांची निवड करा. बदामांमुळे भारतामध्‍ये वाढत चाललेल्‍या मधुमेह सारख्‍या जीवनशैली आजारांवर उत्तमरित्‍या नियंत्रण ठेवण्‍यामध्‍ये मदत होऊ शकते. बदाम सेवन केले जाणा-या आणि उपवास इन्‍सुलिन पातळ्यांवर परिणाम करणा-या कार्बोहायड्रेट खाद्यपदार्थांचे रक्‍तशर्करेवरील परिणाम कमी करण्‍यामध्‍ये मदत करतात. [9] 

सुप्रसिद्ध फिटनेस व सेलिब्रिटी इन्‍स्‍ट्रक्‍टर यास्‍मीन कराचीवाला म्‍हणाल्‍या, व्‍हॅलेंटाइन्‍स डे हा प्रियजनांसोबत उत्तम वेळ व्‍यतित करण्‍यासाठी आणि ते पात्र असलेली त्‍यांच्‍याप्रती काळजी दाखवण्‍यासाठी दिवस आहे. माझ्या मते हे प्रेम व्‍यक्‍त करण्‍याचे अनेक मार्ग आहेत आणि यासाठी डिनरचे नियोजन किंवा महागडा खर्च करत सुट्टीची मौजमजा घेणे याचीच आवश्‍यकता नाही. आपल्‍या प्रि‍यजनांसाठी व्‍यायामशाळा सदस्‍यत्‍व, ऑनलाइन पिलेट्स क्‍लासमध्‍ये नोंदणी किंवा त्‍यांना स्‍वत:ची काळजी घेण्‍यास प्रोत्‍साहन आणि त्‍यांच्‍यासोबत नियमितपणे व्‍यायाम करत तुमचा जोडीदार किंवा प्रि‍यजनांच्‍या आरोग्‍याकडे लक्ष देऊ शकता. नियमित फिटनेस नित्‍यक्रमासह त्‍यांच्‍यासोबत बदाम देखील शेअर करा. बदाम हे व्‍यायामापूर्वी किंवा व्‍यायामानंतरचे परिपूर्ण खाद्यपदार्थ आहेत. बदामांमध्‍ये ऊर्जा देण्‍याची क्षमता असण्‍यासोबत भूकेचे शमन करणारे गुणधर्म आहेत, ज्‍यामुळे पोट भरल्‍यासारखे वाटते[10]. यामुळे फिटनेसबाबतच्‍या त्‍यांच्‍या प्रवासामध्‍ये साह्य होईल. प्रि‍यजनांच्‍या फिटनेसप्रती कटिबद्धता हा यंदाच्‍या व्‍हॅलेंटाइन्‍स डेसाठी सर्वोत्तम गिफ्ट असू शकतो. यामुळे त्‍यांना दीर्घकाळापर्यंत आरोग्‍यदायी राहण्‍यामध्‍ये मदत होईल. 

दिल्‍लीमधील मॅक्‍स हेल्‍थकेअरच्‍या डायटेटिक्‍सच्‍या प्रादेशिक प्रमुख रितिका समाद्दार म्‍हणाल्‍या, व्‍हॅलेंटाइन्‍स डेला अगदी मनापासून गिफ्ट दिले जाते आणि अनेक पर्याय उपलब्‍ध असल्‍यामुळे सहजपणे गोंधळून जायला होते. मी नेहमीच प्राप्‍तकर्ताच्‍या उत्तम आरोग्‍यामध्‍ये सकारात्‍मकपणे योगदान देणारे गिफ्ट्स देण्‍याची शिफारस करते आणि मी याबाबतील बदामांचा सल्‍ला देते. बदाम हे चविष्‍ट व आरोग्‍यदायी स्‍नॅक आहेत, तसेच ते हृदयाचे आरोग्‍य उत्तम राखण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी देखील ओळखले जातात.[11] युकेमध्‍ये नुकतेच करण्‍यात आलेल्‍या संशोधनामध्‍ये प्रौढ व्‍यक्‍तींनी सांगितले कीबदामांच्‍या सेवनामुळे हृदयविषयक आजाराचा धोका जवळपास ३० टक्‍क्‍यांनी कमी झाला आणि एंडोथेलियल फंक्शन व कार्डियाक ऑटोनॉमिक फंक्शनमध्‍ये सुधारणा झाली. [12]

पिलेट्स तज्ञ आणि आहार व पोषण सल्‍लागार माधुरी रूईया म्‍हणाली, व्‍हॅलेंटाईन्‍स डेला अनेक लोक कॅलरी-संपन्‍न खाद्यपदार्थांचा मनसोक्‍त आस्‍वाद घेतात. तुम्‍ही रेस्‍टॉरण्‍टमध्‍ये डिनर टाळत आणि तुमच्‍या जोडीदारासोबत घरीच बनवलेल्‍या जेवणाचा आस्‍वाद घेत यावर नियंत्रण ठेवू शकता. यामध्‍ये बदामांसारख्‍या आरोग्‍यदायी घटकांचा समावेश करा. बदाम सहजपणे उपलब्‍ध होण्‍यासोबत स्‍वादामध्‍ये भर करतात आणि जवळपास सर्वच भारतीय मसाले व हर्ब्‍समध्‍ये बदामांचा वापर केला जातो. तुम्‍ही आरोग्‍यदायी व स्‍वादिष्‍ट खाद्यपदार्थ बनवण्‍यासाठी तुमच्‍या जोडीदाराच्‍या आवडत्‍या मिष्‍टान्‍नांमध्‍ये बदाम देखील मिक्‍स करू शकता.

यंदाच्‍या व्‍हॅलेंटाइन्‍स डेला प्रियजनांना बदामांच्‍या सेवनासह आरोग्‍यदायी राहण्‍यास प्रोत्‍साहित करा! तुमच्‍या प्रियजनांसाठी व्‍हॅलेंटाइन्‍स डे खास बनवणारी बदामाची पाककला पुढीलप्रमाणे.       

Leave a Reply

%d bloggers like this: