सचिन तेंडुलकरचा भारतरत्न काढून घ्या; संभाजी ब्रिगेडची मागणी

पुणे, दि. ४ – सचिन तेंडुलकर भाजपची दलाली करण्यासाठी शेतकऱ्यांच्या विरोधात बोलत आहे. शेतकरी स्व-संरक्षणासाठी आंदोलन करत आहे हे दिसत नाही का…? शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून शेतात जे धन्य पिकवलेले आहे, तेच खातात आणि त्यांच्याच विरोधात बोलण्याची यांची हिंमत कशी होते…? हे कळायला मार्ग नाही. ही मानसिक व वैचारिक गुलामी आहे. शेतकरी जर जगाचा पोशिंदा असेल तर, त्यांना सन्मानाची वागणूक व पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे. अकलेचे तारे तोडणाऱ्याचा ‘भारतरत्न’ काढून घेतला पाहिजे…! अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.

शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, तीन लागडं आणि बारा माकडांचा बाजार आहे. त्यांना शेतकऱ्यांचे दुःख काय कळणार… ‘भटाल दिली ओसरी… भट हात पाया पसरी’…! अशीच यांची गत आहे. तेंडूलकर ही फितूरी आहे.

पोपट बोलू लागले,
माना डोलू लागले…!
विसरुनी अन्नदात्यास,
राष्ट्र राष्ट्र गाऊ लागले…!

देशात सध्या शेतकऱ्यांपेक्षा कोणीही मोठा नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: