भाजप एनजीओ आघाडी पुणे शहर अध्यक्षपदी डॉ. अजय दुधाणे यांची निवड

पुणे, दि. ४ – आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे डॉ.अजय दुधाणे यांची भारतीय जनता पार्टी, एन.जी.ओ. आघाडी पुणे शहर  अध्यक्षपदी निवड झाली आहे. भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी डॉ.दुधाणे यांना निवडीचे पत्र दिले. 

डॉ.अजय दुधाणे हे सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय,नवी दिल्ली च्या सल्लागार समिती सदस्य आणि फेडरेशन आॅफ इंडियन एनजीओ फॉर ड्रग अब्युज प्रिव्हेन्शन, नवी दिल्लीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून ते काम पहात आहेत. 
मागील १९ वषार्पासून सामाजिक कार्यात कार्यरत असून देशातील मानाचा मदर तेरेसा सद्भावना व महाराष्ट्र शासन पुरस्कारासह देशातील व राज्यातील मिळून २९ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कोरोना काळात देखील मोलाचे कार्य त्यांनी केले आहे. कोरोना काळात ५ हजार आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप केले होते.
  महाराष्ट्रातील पहिले इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र ,अनेक वर्षापासून सातत्याने दारु नको दुध प्या असे तरुणांना व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी उपक्रम ते आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून राबवित आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: