अवीट गोडीच्या गाण्यांनी सजली स्वर मैफल स्वच्छंद

पुणे : सत्य शिवाहून सुंदर हे…धुंद एकांत हा…धुंदी कळ््यांना धुंदी फुलांना…या सुखांनो या…नवीन आज चंद्रमा…एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे…ही सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली एकाहून एक अप्रतिम गाणी सादर करीत रसिकांना सुरेल गीतांची सफर घडविली. गायिका आरती आठल्ये आणि रविंद्र शाळू यांनी गायलेल्या अवीट गोडीच्या गाण्यांनी या सुखांनो या ही स्वर मैफल सजली.

स्वच्छंद – आरोही प्रस्तुत या सुखांनो या संगीतकार व गायक सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि गायलेल्या गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी शिक्षणतज्ञ डॉ. दत्तात्रय तापकीर,राजकुमार सुराणा, धनंजय पुरकर, दत्ता थिटे उपस्थित होते. कोरोना-लॉकडाऊन नंतर सादर झालेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सोशल डिस्ट्न्सिंगचे पालन करुन कार्यक्रम सादर झाला. 

कार्यक्रमाची सुरुवात सत्य शिवाहून सुंदर या सुरेल गीताने झाली. त्यानंतर आम्ही जातो आमुच्या  गावा चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांच्या स्वप्नात रंगले मी हे बाबूजी यांनी संगीतबद्ध केलेले युगुल गीत सादर झाले. रविंद्र शाळू यांनी सादर केलेल्या जगाच्या पाठीवर चित्रपटातील एक धागा सुखाचा या गीताला प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे वन्समोअर दिला. आकाशी झेप घेरे पाखरा…त्या तिथे पलिकडे माझिया प्रियेचे झोपडे…तुझी माझी प्रित जगावेगळी या गाण्यांनी रसिकांना जुन्या काळाची सफर घडविली. 

कुंकवाचा करंडा चित्रपटातील आज प्रितीला पंख हे लाभले रे ,झेप घेऊनी पाखरु चालले रे…या गीताला रसिकांनी टाळ््यांच्या कडकडाटात दाद दिली. पडदा लाजंचा लाजंचा…बघत राहू दे तुझ्याकडे…या गीतांनी बाबूजींच्या आठवणी ताज्या केल्या. सिद्धार्थ बेंद्रे यांनी निवेदन केले. अपूर्व द्रविड, ऋतुराज कोरे, सचिन वाघमारे, यश भंडारे यांनी साथसंगत केली.

Leave a Reply

%d bloggers like this: