लग्नाला निघालेल्या वरुण धवनच्या गाडीला अपघात

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या गाडीला अपघात झाला आहे. शनिवारी वरुण त्याच्या लग्नासाठी जुहूवरुन अलिबागच्या दिशेने रवाना झाला होता.

मात्र, याचवेळी वाटेत त्याच्या गाडीला अपघात झाला आहे. सुदैवाने वरुणला कोणतीही दुखापत झालेली नाही. परंतु, लग्नाला जाण्यापूर्वीच हा अपघात झाल्यामुळे सर्वत्र चिंतेच वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे.

याविषयी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

वरुण धवन आज ( २४ जानेवारी) त्याची प्रेयसी नताशा दलालसोबत लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाच्या तयारीसाठी वरुण आणि नताशाच्या घरातली मंडळी शुक्रवारीच अलिबागला पोहोचले होते.

मात्र, काही कारणास्तव वरुणला जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे तो २३ तारखेला त्याच्या कारने अलिबागच्या दिशेने रवाना झाला होता.

याचवेळी वाहतूक कोंडीत सापडलेल्या वरुणच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्याच्या गाडीचं किरकोळ नुकसान झालं आहे. मात्र, वरुणला कोणतीही दुखापत झालेली नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: