Thursday, June 18, 2026
MAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

‘सिरम’ची आग पुन्हा भडकली

पुणे, दि. २१ – सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या इमारतीमधील अग्नितांडव संपता संपत नाहीये. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर विजवलेली आग आता पुन्हा संध्याकाळी सातच्या सुमारास भडकली आहे. अग्निशामक दलाकडून पाण्याचा फवारा मारून आग विजवण्याचे काम सुरू आहे.

सिरममध्ये लागलेली ही भीषण आग वेल्डींगाच्या कामामुळे लागलेली असून या आगीत पाच निष्पापांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची अधिकृत माहिती ओगयमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. या पाचही जणांचे मृतदेह हे हडपसर येथील नोबल हॉस्पिटल येथे आणण्यात आले असून अद्याप त्यांची नावे स्पष्ट होवू शकलेली नाहीत. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे नोबलचे संचालक डॉ. एच. के. साळे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सीरमची आग तब्बल चार तासांनंतर आटोक्यात आली असून घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading