‘प्लॅस्टिक निर्मूलन’ विषयावर वेबिनार
पुणे, दि. १७ – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट तर्फे ‘प्लॅस्टिक निर्मूलन ‘ विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते . मेहराज रशीद शेख यांनी मार्गदर्शन केले. स्वामी विवेकानंद यांच्या जयंती आणि युवक सप्ताहानिमित्त राष्ट्रीय सेवा योजने तर्फे ऑनलाईन व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले होते. ऑनलाईन झालेल्या या व्याख्यानात विद्यार्थी ,प्राध्यापक वर्ग सहभागी झाला.
