ईश्वर पुरम संस्थेतील नव्याने उभारलेल्या सभागृहाचे उद्घाटन
पुणे, दि. 17 – मकर संक्रांतीच्या दिवशी ईश्वर पुरम या संस्थेतील नव्याने उभारलेल्या सभागृहाचे उद्घाटन महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड च्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले ही इमारत पूर्णत्वाला नेण्यासाठी एमएनजीएल संस्थेने आर्थिक सहकार्य केले आहे. या कार्यक्रमात एम एन जी एल चे कार्यकारी संचालक हलदर आणि संचालक मुकादम यांनी ईश्वरपूर अमच्या कार्याचे कौतुक केले, तसेच विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात मिळविलेल्या उज्वल यशा विषयीही समाधान व्यक्त केले.
नागालँडचे माजी राज्यपाल माननीय पद्मनाभजी आचार्य यांनी नागालँड येथील 20 विद्यार्थी शिक्षणासाठी ईश्वर पुरम संस्थेत पाठविले आहेत हे सर्व विद्यार्थी जवळच्याच लोक सेवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतात. शाळेला क्रीडा क्षेत्रात अनेक पारितोषिके या विद्यार्थ्यांनी मिळवून दिली आहेत. विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्य आणि अन्य आवश्यक साहित्याची मदत करण्याचेही आश्वासन एम एन जि एल च्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी दिले.
या कार्यक्रमात ईश्वर पुरम संस्थेचा परिचय प्रशांत जोशी यांनी करून दिला तर ईश्वरपूरम चे अध्यक्ष विनीत कुबेर यांनी उपस्थितांचे स्वागत केले कार्यवाह कृष्णकांत सातव यांनी आभार मानले . कार्यक्रमासाठी एम एन जी एल चे अन्य संचालक राजेश पांडे, सोनटक्के व अमित गर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मेहता यांनी केले.
