रमेश थावरे यांची ‘सीओटी’ म्हणून निवड
पुणे, दि. १७ – भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) कोथरुड शाखेचे विमा प्रतिनिधी रमेश थावरे यांची आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘कोर्ट ऑफ द टेबल’ (सीओटी) म्हणून निवड झाली आहे. ‘एलआयसी’ने नुकतीच देशातील १२५ सीओटींची यादी जाहीर केली.
अमेरिकेतील’ न्यू ऑलिन्स’ येथे जून २०२१ मध्ये होणार्या आंतरराष्ट्रीय एमडीआरटी मिलियन डॉलर राउंड टेबल (एमडीआरटी) परिषदेत सहभागी होण्यासाठी ते पात्र ठरले आहेत.
थावरे २००५ पासून विमा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. आत्तापर्यंत पाच हजारहून अधिक ग्राह्कांना त्यांनी विमा सेवा पुरविली आहे. पाच वेळा एमडीआरटी दर्जा प्राप्त केला आहे. कोथरुड शाखेचे सिनिअर बिझनेस असोसिएट प्रमोद नांगरे, शाखाधिकारी समीर टोपरे आणि सहायक शाखाधिकारी मिनाझ शेख यांनी मार्गदर्शन केले.
