fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर ED ची छापेमारी

पुणे – पुण्यातील एका सहकारी बँकेवर अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. या बँकेत तब्बल 71 हजार कोटींचा घोटाळा झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून या बँकेच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर आज ED ने छापेमारी केली आहे. आज सकाळच्या वेळेत अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी बँकेवर धाड टाकली. यावेळी अनिल भोसले व रेश्मा भोसले यांच्यासह 14 संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तब्बल 71 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

यावेळी काही महत्वाची कागदपत्रंही ईडी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत. बँकेसोबतच अनिल भोसले यांच्या शिवाजीनगरमधील कार्यालयावरही ईडीने छापे टाकले आहे. सकाळपासून तिथंही झाडाझडती सुरू आहे. बँक घोटाळ्याची व्याप्ती 350 ते 400 कोटींच्या पुढे गेल्यानं पुणे आर्थिक गुन्हे शाखेनं ईडीला कळवलं होतं.

त्यानुसार ईडीने आज आमदार अनिल भोसले यांच्या ऑफिसवर छापा टाकला. आमदार अनिल भोसले सध्या तुरूंगात आहेत. भोसले हे राष्ट्रवादीचे आमदार असले तरी त्यांच्या पत्नी भाजपच्या नगरसेविका आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे अनेक नेते चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला एक महिलेसोबत असलेल्या संबंधातून दोन मुलं असल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या मागे ईडीचं चक्र मागे लागल्यानेही हेदेखील चर्चेत होते. आता तर तब्बल 71 हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणात NCP चे आमदार अनिल भोसले यांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading