फ्लेम युनिव्हर्सिटीतर्फे २३ आणि २४ जानेवारी २०२१ रोजी द पर्पज समिटचे आयोजन
पुणे – भारतामध्ये उदारमतवादी शिक्षणाची आद्यप्रवर्तक संस्था म्हणून नावाजल्या जाणाऱ्या फ्लेम युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्या ‘फ्लेम पर्पज समिट’चे आयोजन केले जाणार आहे. २३ आणि २४ जानेवारी २०२१ या दोन दिवसात होणार असलेल्या या व्हर्च्युअल परिषदेसाठी ‘उद्देश्य’ ही संकल्पना ठरवण्यात आली आहे. आपण करत असलेली प्रत्येक कृती ही काहीतरी उद्देशासाठी असते आणि आजच्या काळात उद्देश्य सर्वाधिक महत्त्वाचे ठरत आहे, हा विचार डोळ्यासमोर ठेवून या परिषदेमध्ये विचारमंथन केले जाणार आहे.
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील प्रख्यात, प्रसिद्ध व्यक्तींना एकत्र येऊन उद्देश्य या संकल्पनेवर आपले विचार मांडण्यासाठी प्रभावी मंच म्हणून, व्यक्ती, संस्था, राष्ट्रे आणि एकंदरीत जगाच्या कृतींना आकार देणारे बल म्हणून द पर्पज समिटचे योगदान फार मोलाचे ठरणार आहे. आजच्या काळात जेव्हा आपण सर्वजण अस्थिरतेचा सामना करत आहोत, तेव्हा याप्रकारचे विचारमंथन अतिशय उपयुक्त ठरू शकते. उद्देश्य भावना जोपासणारी लक्ष्ये जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणू शकतात आणि प्रभाव निर्माण करू शकतात.
द पर्पज समिटमध्ये धोरणकर्ते, उद्योग-व्यवसायांचे प्रमुख, शिक्षणतज्ञ, राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि उद्यमी यांच्यामध्ये संवाद घडून येईल व विचारांची देवाणघेवाण होईल. उद्देश्य या संकल्पनेच्या विविध पैलूंवर चर्चा होईल, ‘उद्देशामुळे’ व्यक्ती, संस्था, राष्ट्रे आणि एकंदरीत जगाच्या कृतींना कसा आकार दिला जातो यावर विचार होईल.
फ्लेम युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. दिशान कामदार यांनी सांगितले, “व्यक्ती, संघटना, समुदाय आणि देश म्हणून आपल्या प्रत्येकाच्या जीवनात ‘उद्देश्य’ खूप मोठा प्रभाव घडवून आणत असते. आणि तरीही आपल्यापैकी अनेकजण रोजच्या समस्यांना तोंड देण्यात स्वतःला हरवून बसतो. तथापि, आपण गोंधळ दूर सारून अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे ज्या आपल्यापैकी प्रत्येकाला प्रेरित करतात. ही एकल मानसिकता हा यशस्वी आणि सरासरीमधला फरक आहे. आजच्या काळातील यशस्वी व्यक्तींचे अनुभव आणि ज्ञान यापासून प्रेरणा घेण्याची संधी समाजासाठी उपलब्ध करवून देण्यासाठी प्रभावी मंच म्हणून द फ्लेम पर्पज समिटचे आयोजन करण्यात येत आहे. ज्ञान प्रदान करणारी संस्था म्हणून असे मानतो की लोकांना त्यांच्या जीवनाचे उद्देश्य शोधण्यात मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे.”
फ्लेम युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. दिशान कामदार, वेल्सले कॉलेजचे प्रोव्होस्ट व डीन अँड्र्यू शेनन, जागरण ग्रुपचे अध्यक्ष अपूर्व पुरोहित, अम्हेर्स्ट कॉलेजच्या प्रोव्होस्ट व डीन ऑफ फॅकल्टी कॅथरीन ए एपस्टेन, सीईआयबीएसचे युरोपियन प्रेसिडेंट व प्रोफेसर – मार्केटिंग डॉ दीपक चंद जैन, भारतीय पत्रकार व टीव्ही बातम्यांचे सूत्रसंचालक फाये डीसुझा, एचएसबीसी इंडियाच्या माजी कन्ट्री हेड व ग्रुप जनरल मॅनेजर नैना लाल किडवाई, इन्फो एजचे संस्थापक व एक्झिक्युटिव्ह चेयरमन संजीव बिखचंदानी, हरप्पा एज्युकेशनच्या संस्थापक व सीईओ श्रेयसी सिंग, ईएनएएम ग्रुपचे सह-संस्थापक व चेयरमन वल्लभ भंशाली, क्वाट्रोचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर रमण रॉय हे व इतर या परिषदेमध्ये व्याख्याते म्हणून सहभागी होणार आहेत.
द फ्लेम पर्पज समिटमधे सहभागी होण्यासाठी कृपया येथे लॉग ऑन करा: http://purposesummit.flame.edu.in/
अधिक माहितीसाठी कृपया येथे ई-मेल करा: purposesummit@flame.edu.in
