fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

भाजप सहकार आघाडी पुणे शहर कार्यकारिणी जाहीर

पुणे : भारतीय जनता पक्ष सहकार आघाडीची पुणे शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. शनिवारी भाजपा शहर कार्यालयात शहराध्यक्ष जगदीश मुळीक,सहकार आघाडी पुणे शहराध्यक्ष सचिन दांगट यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

सहकार आघाडीच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी गिरीश घोरपडे, निळकंठ शेळके, दिलीप पर्वतीकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. सरचिटणीस पदावर दीपक दुधाणे,अजित देशपांडे,डॅा.धनंजय जोशी,चिटणीसपदी माया गायकवाड,बरखा लाहोटी,बिपीन रोठे तसेच कोषाध्यक्षपदी सुभाष आगरवाल यांच्यासह ३१ पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याप्रसंगी पुणे शहर प्रभारी धीरज घाटे,सरचिटणीस गणेश घोष,नगरसेवक दीपक पोटे,युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांच्यासह सहकार आघाडीचे नवनियुक्त पदाधिकारी आणि मित्र परिवार उपस्थित होते.

सर्व नवनियुक्त पदाधिका-यांमार्फत सहकार विषयक योजना लोकांपर्यत पोहचविणे, नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करणे अशा गोष्टी केल्या जाणार असल्याचे सचिन दशरथ दांगट यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading