Wednesday, June 17, 2026
MAHARASHTRAPUNE

कोकण बिझनेस फोरम च्या वतीने व्हेनामी कोळंबी प्रशिक्षण शिबीर

पुणे : कोकण बिझनेस  फोरम च्या वतीने व्हेनामी जातीच्या  कोळंबीच्या संवर्धन संबंधी  प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर दि. १७ जानेवारी २०२१ रोजी  सकाळी १० ते सायंकाळी  ६ या वेळात होईल.कोकण बिझनेस  फोरम चे संस्थापक संजय यादवराव यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.  


https://forms.gle/PrtTVpoGexAFDvzr8 या लिंकवर जाऊन प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करता येईल. गेली वीस वर्ष कोळंबी शेती प्रकल्प यशस्वीपणे राबवणारे व निर्यात करणारे काशिनाथ तारी हे या प्रशिक्षणाचे मार्गदर्शक आहेत.जगभरात प्रचंड मागणी असलेली कोळंबी, या उद्योगांमध्ये मागील दहा वर्षात आंध्र प्रदेश या राज्यांनी प्रचंड प्रगती केली, पुढील काळात कोकणातील बॅकवॉटर आणि समुद्रकिनारे येथे आधुनिक कोळंबी शेती प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. त्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. 

व्हेनामी कोळंबी शेती
  700  किलोमीटर समुद्रकिनारा, हजारो किलोमीटर खाड्या ,बॅक वॉटर, नद्या ,बंधारे ,  धरणे, तलाव, प्रचंड पडणारा पाऊस परमेश्वराने कोकणाला भरभरून दिले आहे.
 समुद्रातील मासेमारीला मर्यादा आहेत. परंतु कोकणात माशांच्या शेतीच्या अमर्याद संधी आहेत.नीट नियोजन केल्यामुळे आंध्र प्रदेश या एका राज्यात 14 हजार कोटी रुपयांची व्हेनामी  नावाची कोळंबी उत्पादित होते.एका उत्पादनाची ही क्षमता आहे . खाऱ्या पाण्यातील मत्स्य  उत्पादनाला खूप चांगला भाव मिळतो. व ही सर्व  उत्पादने निर्यातक्षम आहेत. निर्यातीसाठी सुदैवाने देशातील सर्व प्रमुख निर्यातदार तळोजा परिसर, नवी मुंबई म्हणजे कोकणात आहेत व निर्यात जेएनपीटी या कोकणातील बंदरातून होते. मात्र देशातील सर्वाधिक उत्पादन आंध्र प्रदेश आणि गुजरात मध्ये होते.
 कोकणातील तरुणांसाठी व्यावसायिकांसाठी सर्व जिल्ह्यात व मुंबईत  मार्गदर्शनपर शिबिरे, व्हेनामी कोळंबी शेती, जिताडा पालन, खेकडा पालन, बासा, रौहु, कटला, तिलापिया, अशी विविध मस्य उत्पादने घेणारे यशस्वी मत्स्य  उद्योजक, आणि तज्ञ यांच्या मदतीने प्रत्यक्ष प्रकल्पावर प्रशिक्षण शिबिर असे अनेक उपक्रम कोकण बिझनेस फोरम च्या माध्यमातून राबवण्यात येत आहेत.
     
 रविवार दिनांक १७ जानेवारी २०२१ सकाळी १०.००  ते सायं.०६.०० यावेळेस पूर्ण दिवसाचे व्हेनामी कोळंबी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे.
 कोकणात भविष्यात आपल्या भागात प्रकल्प उभारायचा आहे, अशा कोकणवासियांनी या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी संपर्क करा.

कोकण बिझनेस फोरम संपर्क -९०८२७८१५५१/ ८८५०८०७२२७

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading