fbpx
Monday, June 17, 2024
BusinessPUNE

देशांतर्गत व्यवसायानिमित्त प्रवासकरणाऱ्यांनी पसंती दिलेल्या टाॅप १० शहरांमध्ये पुण्याचा समावेश

पुणे, दि. ६ – ओयो ट्रॅव्हलोपीडिया २०२० या वार्षिक प्रवास निर्देशांक व अहवालाचे प्रकाशन ओयो हाॅटेल्स अँड होम्स या जागतिक पातळीवरील अग्रगण्य अशा हाॅस्पिटॅलिटी सुविधा पुरविणाऱ्या कंपनीने नुकतेच केले. जगभरामध्ये २०२० वर्षातील सर्वाधिक बुकिंग हे दिल्ली शहरामध्ये झाले आहे. तसेच व्यवसायानिमित्त प्रवास करणाऱ्यांनी वास्तव्यासाठी दिलेल्या पसंतीच्या शहरांमध्ये पुणे शहराने टाॅप १० मध्ये स्थान पटकावले आहे. सुटीचा काळ असल्यामुळे आणि अनलाॅक प्रक्रिया सर्व शहरांमध्ये सुरू असल्यामुळे डिसेंबर २०२० या महिन्यात सर्वाधिक मागणी असल्याचे निदर्शनास आले. 

ओयो ट्रॅव्हलोपीडिया २०२० ची ठळक वैशिष्ट्यः

·  महामारीच्या काळातही ग्राहकांनी ओयोवर प्रेम करण्याची कारणे :

   १.परदेशातून भारतात परतल्यानंतर कराव्या लागणाऱ्या संस्थात्मक विलगीकरणासाठी ओयो सुविधेचा लाभ सुमारे ७३ हजार भारतीयांनी घेतला. कतार, कुवेत, ओमान, सौदी अरेबिया, युएई, मध्य पूर्व या भागातून येणाऱ्या परदेशी नागरिकांनी अशाप्रकारचा सर्वाधिक लाभ घेतला आहे.

     २. ५० हून अधिक सरकारी व खासगी रुग्णालये आणि २४ हून अधिक सरकारी विभागांबरोबर ओयो केअरने भागीदारी केली 

 ३. कोव्हिडची लक्षणे न दिसणाऱ्या (असिम्प्टोमॅटिक) रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचारी अशा एकून २५०,००० हून अधिक जणांना ओयोच्या हाॅटेल्समध्ये  एप्रिल २०२० पासून ठेवण्यात आले होते 

  ४. २०० हून अधिक नाविकांचे ओयोमध्ये विलगीकरण करण्यात आले आहे 

·  वस्तू हरविण्याचे प्रमाणः  लाॅस्ट अँड फाउंड अॅट ओयोः देशातील ओयोच्या वास्तूंमध्ये सुमारे २११२ ग्राहकांनी त्यांच्या वस्तू विसरल्याची तक्रार नोंदविली

·  नवीन ट्रेंडः २०२० मध्ये ओयो अॅप आणि संकेतस्थळावरून सुमारे ८५ लाख नव्या ग्राहकांनी बुकिंग केले आहे

·  अध्यात्मिक पर्यटनाचा कलः  पुरी पर्यटनस्थळाला सर्वाधिक पसंती मिळाली, त्यापाठोपाठ वृंदावन, तिरुपती, शिर्डी आणि वाराणसी या अध्यात्मिक पर्यटनस्थळांना पसंती मिळाली

·  चल बिच चलेः समुद्रकिनारी पर्यटनासाठी जाणाऱ्या ग्राहकांची सर्वाधिक पसंती गोव्याला मिळाली, तर त्या पाठोपाठ कोची, वायझॅग आणि पुड्डूचेरी या पर्यटनस्थळांना पसंती मिळाली

·  वारसास्थळ पर्यटनः उत्तर भारतातील जयपूर, उदयपूर आणि आग्रा या वारसास्थळांना भारतीयांनी पसंती दिली 

·  वेलकम २०२१ः नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोवा आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणांना ग्राहकांची सर्वाधिक पसंती राहिली आहे. सर्वाधिक मागणी ३० डिसेंबर २०२० आणि १ जानेवारी २०२१ या दोन दिवसांसाठी नोंदविली गेली. 

ओयो हाॅटेल्स अँड होम्सचे भारत व दक्षिण आशिया विभागाचे मुख्यकार्यकारी अधिकारी रोहीत कपूर म्हणाले, “ ओयोच्या ट्रॅव्हलोपीडियाच्या निष्कर्षातून हे स्पष्ट होते की भारतीय नागरिक हे पुन्हा प्रवास आणि पर्यटनासाठी सज्ज झाले आहेत. ओयोसुद्धा या सर्व नागरिकांच्या स्वागतासाठी तत्पर आणि सज्ज आहे. १२८ वेळा ओयोमध्ये राहणाऱ्या एका ग्राहकाने ओयोवर दाखविलेल्या विश्वासामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. आम्ही ग्राहकांप्रती घेत असलेली काळजी आणि त्यांना देत असलेल्या उत्तम सेवेचे हे फळ आहे आणि अतिशय खडतर व आव्हानात्मक परिस्थितीमध्येही ग्राहकांनी आमच्यावर दर्शविलेल्या विश्वासाचे हे प्रतिक आहे. अशा काही प्रसंग आणि घटनांमुळे आमचा आत्मविश्वास बळावतो आणि आम्ही खात्रीपूर्वक म्हणू शकतो की या संकटकाळातून बाहेर पडताना ओयो कंपनी अधिक सक्षम आणि कणखर बनली आहे. २०२१ मध्ये नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेतच. पण आम्हाला विश्वास वाटतो की २०२० मध्ये आम्ही केलेल्या काही बदलांमुळे पर्यटन आणि हाॅस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये काही नवीन पायंडे पडतील. ग्राहकांना पूर्णपणे सुरक्षित आणि आरोग्यदायी सेवा पुरविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading